Rahul Gandhi : “राहुल गांधींच्या मनात भारताविषयी द्वेष”; भाजपाची जहरी टीका
अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बोलताना राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या विधानांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Rahul Gandhi – भाजपने मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. परदेश दौऱ्यांदरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि निवडणूक प्रणालीबद्दल केलेल्या विधानांचा संदर्भ देत भाजपने म्हटले की, परदेशातून आपली राजकीय कारकीर्द पुन्हा जिवंत करण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न भारतीय जनता कधीही स्वीकारणार नाही. (Rahul Gandhi)
राहुल गांधींवर निशाणा साधत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, राहुल गांधी परदेशातून आपली राजकीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू शकतात, परंतु ज्या व्यक्तीच्या कणाकणात देशाबद्दल द्वेष भरलेला आहे, तिला इथली जनता कधीही स्वीकारणार नाही. लोवी इन्स्टिट्यूटच्या निकषांनुसार, भारताच्या गुणांमध्ये ०.५ ने सुधारणा होऊन ती ४०.५ वर पोहोचली आहेत. २०१८ नंतरची ही सर्वात कमी तफावत आहे; चीनचे गुण ७३.६ इतके आहेत. (Rahul Gandhi)
गुरु नानक देव यांची जयंती प्रकाश पर्वच्या निमित्ताने भाजपच्या अनेक नेत्यांनी गुरुद्वारांमध्ये प्रार्थना केली आणि सेवाकार्यात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी देशाला, विशेषतः पंजाबला, अमली पदार्थमुक्त (ड्रग्ज-मुक्त) करण्यासाठी काम करण्याचा संकल्प केला. तसेच, अमली पदार्थांच्या समस्येवर मात करण्यासाठी पुरेसे प्रयत्न न केल्याबद्दल विरोधी पक्षांवरही टीका केली. (Rahul Gandhi)
दिल्लीतील एका गुरुद्वारात इतर भाजप नेत्यांसह प्रार्थना केल्यानंतर, भंडारी यांनी पत्रकारांना सांगितले की, या पवित्र प्रसंगी पंजाब आणि संपूर्ण देशाला अमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प केला पाहिजे. (Rahul Gandhi)
लोवी इन्स्टिट्यूटच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आशियातील प्रमुख शक्तींपैकी एक म्हणून उदयास आला आहे. गोल्डमन सॅक्स आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेदेखील भारताचे वर्णन जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था असे केले आहे.
दरम्यान, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात बोलताना राहुल गांधी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत केलेल्या विधानांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. ते म्हणाले की, भारत सध्या एका आर्थिक आपत्तीच्या उंबरठ्यावर आहे.
देशात प्रचंड बेरोजगारी आहे, उत्पादन क्षेत्र कोलमडले आहे आणि शिक्षण व्यवस्थेत खोलवर रुजलेल्या समस्या आहेत. जर देश सध्याच्याच आर्थिक मार्गावर चालत राहिला, तर तो गंभीर संकटात सापडू शकतो.






