Arvind Kejriwal : सत्तेच्या हव्यासातून भाजप कुणाशीही युती करेल; अरविंद केजरीवाल यांची टीका
भाजप सत्तेच्या हव्यासातून कुठल्याही पक्षाशी युती करू शकेल. भाजप आणि शिरोमणी अकाली दल सत्तेसाठी कधी एकत्र येतात. तर, कधी वेगळे होतात, असे टीकास्त्र आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोडले.

Arvind Kejriwal : भाजप सत्तेच्या हव्यासातून कुठल्याही पक्षाशी युती करू शकेल. भाजप आणि शिरोमणी अकाली दल सत्तेसाठी कधी एकत्र येतात. तर, कधी वेगळे होतात, असे टीकास्त्र आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सोडले.
आपची सत्ता असणाऱ्या पंजाबमधील विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पक्षासमोर सत्ता राखण्याचे मोठे आव्हान असल्याचे मानले जाते. एकीकडे कॉंग्रेसने त्या राज्यात पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर, दुसरीकडे भाजप आणि शिरोमणी अकाली दलाने पुन्हा युती केली. त्या ताज्या घडामोडीवर केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली.
आपची हातमिळवणी पंजाबमधील जनतेशी आहे. आमचा पक्ष पंजाबच्या विकासासाठी कार्य करत आहे. काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन केले. त्या आंदोलनावेळी विविध कारणांवरून सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. पंजाबची जनता ते विसरलेली नाही, असे ते (Arvind Kejriwal) म्हणाले. त्यामुळे भाजप-शिरोमणी अकाली दल युतीला लक्ष्य करण्यासाठी आप शेतकरी आंदोलनाचा मुद्दा लावून धरणार असल्याचे संकेत मिळाले.






