Farmer – बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळादरम्यान वीज पडून ३७ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृत शेतकऱ्याचे नाव बालाजी बाबूराव चव्हाण असून, ते सबाद्रबाद परिसरात आपल्या शेतात काम करत होते. अवकाळी पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांनी एका झाडाखाली आश्रय घेतला होता. काही क्षणातच त्या झाडावर वीज पडली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. Maharashtra Rain Alert | तसेच, कौडगाव हुडा गावात घडलेल्या दुसर्या घटनेत धनराज आश्रोबा फपाळ या शेतकऱ्याचा बैल वीज पडून दगावला आहे. या दोन्ही घटनांची दखल घेत परळीचे प्रभारी तहसीलदार विनोद रणवारे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. आम्हाला जीवितहानी आणि पशुधनाच्या नुकसानीचे अहवाल प्राप्त झाले आहेत. पंचनाम्याचे अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. बाधित कुटुंबांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, यासाठी आम्ही या प्रकरणांवर कार्यवाही करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.