Pune News : एआय आधारित स्मार्ट एफआयआर प्रणाली विकसित; डॉ. सागर शेळके यांच्या पेटंट अर्जाची केंद्र सरकारकडून अधिकृत नोंद
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर शेळके यांनी विकसित केलेल्या एआय आधारित (Pune News) स्मार्ट एफआयआर प्रणालीबाबतच्या पेटंट अर्जाची केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयामार्फत अधिकृत नोंद झाली आहे.

Pune News : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर शेळके यांनी विकसित केलेल्या एआय आधारित (Pune News) स्मार्ट एफआयआर प्रणालीबाबतच्या पेटंट अर्जाची केंद्र सरकारच्या पेटंट कार्यालयामार्फत अधिकृत नोंद झाली आहे.
एआय आधारित स्मार्ट एफआयआर प्रणालीमुळे गुन्हे नोंदणी व तपास प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी (Pune News) वापर शक्य होणार आहे. प्रत्यक्ष ठिकाणी डिजिटल एफआयआर नोंदणी, आवाज-आधारित माहिती नोंद, गुन्हे नमुने ओळखणे, संभाव्य गुन्ह्यांचे पूर्वानुमान तसेच गुन्हेगारी हॉटस्पॉट्सचे विश्लेषण या सुविधा या प्रणालीद्वारे उपलब्ध होत असून, कायदा अंमलबजावणी यंत्रणेला अधिक अचूक, गतिमान व डेटा-आधारित निर्णय घेण्यास मदत होणार आहे.
डॉ. सागर शेळके यांचे हे संशोधन स्मार्ट पोलिसिंग, डिजिटल प्रशासन व तांत्रिक नवोपक्रमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात असून भविष्यात शासकीय वापर, तांत्रिक विकास तसेच उद्योग क्षेत्राशी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
डॉ. सागर शेळके यांच्या कार्याची दखल घेत श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या (Pune News) कारभारी मंडळाच्या बैठकीत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. यावेळी कारभारी मंडळाच्या अध्यक्षा माजी महापौर कमल व्यवहारे, संस्थेचे मानद सचिव अण्णासाहेब थोरात तसेच इतर सदस्य उपस्थित होते. या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. सागर शेळके यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.






