Pune Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त पुण्यात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर
Pune Navratri Festival : श्री महालक्ष्मी मंदिर व हरजीवन हॉस्पिटल यांच्या तर्फे आयोजन ; रक्तदान शिबीराचेही आयोजन

Pune Navratri Festival : श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग आणि हरजीवन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १६ ते २० ऑक्टोबर २०२६ दरम्यान सारसबागेसमोरील हरजीवन हॉस्पिटल येथे होणार आहे.
शिबिरात नाडी, रक्तदाब, श्वसनाचा दर, शरीराचे तापमान, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि रक्तशर्करेची तपासणी केली जाणार आहे. तसेच सीबीसी, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल, कॅल्शियम, युरिक ॲसिड आणि जीवनसत्त्व बी१२ यांसारख्या रक्ततपासण्याही मोफत उपलब्ध असतील.
महिलांसाठी १८ ऑक्टोबरला मॅमोग्राफी, तर १७ आणि १८ ऑक्टोबरला हाडांच्या घनतेची तपासणी केली जाणार आहे. याशिवाय १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे संयोजन डॉ. सागर रोकडे पाटील यांच्यासह मंदिराचे विश्वस्त, पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत आहेत. महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. नोंदणी व माहितीसाठी ७५१७५६९९२९ या क्रमांकावर संपर्क साधावा.





