Pune : हात धुण्याची सवय ठरतेय आरोग्याची ढाल; 15 ऑक्टोबरला ‘जागतिक हात स्वच्छता दिन’
Pune : १५ ऑक्टोबर जागतिक हात स्वच्छता दिनानिमित्त पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व सांगत जनजागृती करण्यात आली.

Pune : संसर्गजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी हात नियमित आणि योग्य पद्धतीने धुणे गरजेचे आहे. हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना समजावे, यासाठी दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हात स्वच्छता दिन’ म्हणून साजरा केला जातो.
बालवयातच स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या चांगल्या सवयी लागणे महत्त्वाचे आहे, असे न्यू इंग्लिश स्कूल, ससाणेनगर, हडपसरच्या प्राचार्या भानुमती नायडू यांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पी. एम. शहा फाऊंडेशनच्या माध्यमातून जागतिक हात स्वच्छता दिनानिमित्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हात स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी फाऊंडेशनचे प्रा. अरुण फडतरे, सरस्वती मेहता, रूपाली चव्हाण, रवींद्र कावरे, आदिती शितोळे आणि आकाश जाधव, तसेच शाळेच्या श्रेया पत्तार, रूपाली गायकवाड आणि उमा पिल्ले यांनी सहकार्य केले.





