Donald Trump : इराणचे युद्ध लवकरच समाप्त होईल.! डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
मध्यावधी निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली. या निवडणुकीच्या काळामध्ये इराणवर हल्ले केले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Donald Trump – इराणबरोबरचे युद्ध लवकरच समाप्त होईल, असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र हे युद्ध इतक्या लवकर कसे समाप्त होईल, याबाबत त्यांनी काहीही तपशील सांगितला नाही. मध्यावधी निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शक्यता वर्तवली. या निवडणुकीच्या काळामध्ये इराणवर हल्ले केले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान मध्यपूर्वेतील युद्धाशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांनी गुरुवारी व्हाइट हाउसमध्ये ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी आगामी लष्करी रणनितीबाबत चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. मध्यावधी निवडणुकीनंतर अमेरिकेकडून इराणवर अधिक जोरदार हल्ले केले जातील, असे ट्रम्प म्हणाले होते. त्याच अनुषंगाने ही बैठक झाली असल्याचे मानले जाते आहे.
संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्सचे अध्यक्ष डॅन केन हे देखील या बैठकीत सहभागी झाले होते, या बैठकीमध्ये अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी पर्याय सादर केले. इराणमधील अतिमहत्वाच्या ठिकाणी निर्णायक हल्ल्यांची एक योजना विचाराधीन असून त्याचा एक लष्करी सराव देखील करण्यात आला आहे.
इराणची ऊर्जा ठिकाणे, आण्विक प्रकल्प आणि क्षेपणास्त्र आणि ड्रोनसारख्या दारुगोळ्याशी संबंधित ठिकाणांना लक्ष्य केले जाण्याची तयारी अमेरिकेकडून सुरू आहे. यापैकी एखाद्या पर्यायावर ट्रम्प यांच्याकडून सैन्य दलाला हिरवा कंदिल दिला जाण्याची शक्यता आहे.
मद्यावधी निवडणुकीत पोप यांचे मतदान
अमेरिकेच्यामद्यावधी निवडणुकीत ख्रिश्चनांचे सर्वोच्च ध४मगुरू पोप लिओ यांनी टपालाद्वारे मतदान केले आहे. पोप लिओ यांचा जन्म शिकागो येथे झाला असल्याने ते जन्माने अमेरिकेचे नागरिक आहेत. ख्रिश्चन धर्मगुरू बनण्यापुर्वी रॉबर्ट प्रिव्होस्ट असे त्यांचे नाव होते.
जेव्हा जेव्हा शक्य होते, तेंव्हा त्यांनी अमेरिकेत मतदान केले असल्याचे व्हॅटिकनच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. अमेरिकेतल्या निवडणुकीत मतदान करणारे ते पहिलेच पोप ठरले आहेत.





