Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील पीडब्ल्यूडी विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उघडकीस आणल्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक व्हिडिओ समोर आणला आहे. मंगळवारी त्यांनी कुर्ला विभागातील एका पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. अशातच त्यांनी दुसऱ्या पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा व्हिडिओ उघडकीस आणला आहे. या व्हिडिओने विभागातील गैरकारभार आणि लाचखोरीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. कारवाईच्या मागणीने धरला जोर संदीप देशपांडे यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत ‘सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त “खाते ” भाग दुसरा…’ असे कॅप्शन दिले आहे या नव्या व्हिडिओमध्येही लाच घेण्यासंदर्भात संशय निर्माण करणारा संवाद आणि दृश्ये दिसत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. ; सलग दोन दिवसांपासून समोर येत असलेल्या या ‘कॅश बॉम्ब’ व्हिडिओमुळे पीडब्ल्यूडी विभागात मोठी खळबळ माजली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. शिवसेना आणि मनसेकडून कॅश बॉम्बचा धमाका दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांसोबतचा व्हिडीओ शेअर करत राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. अंबादास दानवेंनी टाकलेल्या कॅश बॉम्बमुळे राजकारण तापले असतानाच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी देखील काल (मंगळवारी) पीडब्लुडीच्या अधिकाऱ्यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ समोर आणला. हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना आणि मनसेकडून कॅश बॉम्बचा धमाका सुरू आहे. त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. याच मुद्द्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची चिन्ह दिसून येत आहेत. Sandeep Deshpande | हेही वाचा: pune : तासात साडेसात लाखांनी केले पुस्तक वाचन