Ashok Kharat Case : 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती; SITकडून मोठी हालचाल, भोंदू बाबाची ‘कुंडली’ उघड होणार

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात ३०० व्हिडिओ सापडल्याने खळबळ उडाली आहे.

Updated On:
Ashok Kharat Case : 300 व्हिडीओ पोलिसांच्या हाती; SITकडून मोठी हालचाल, भोंदू बाबाची ‘कुंडली’ उघड होणार

Ashok Kharat Case : नाशिकमध्ये गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता तपासाला वेग आला असून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणात तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (SIT) सखोल चौकशी करत आहे.

तपासादरम्यान एसआयटीच्या हाती तब्बल 300 हून अधिक आक्षेपार्ह व्हिडीओ लागल्याची माहिती समोर आली आहे. हे व्हिडीओ 2024 मधील असून दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत तयार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या व्हिडीओंच्या आधारे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, एसआयटीने तपासाचा फोकस केवळ गुन्ह्यांपुरता मर्यादित न ठेवता आर्थिक आणि मालमत्तेच्या अंगानेही वाढवला आहे. यासाठी आयकर विभाग, मुद्रांक व नोंदणी विभाग आणि पासपोर्ट विभागाला पत्र पाठवून खरातच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि परदेश दौऱ्यांची माहिती मागवण्यात आली आहे. ‘ओकस प्रॉपर्टी’ हेच या सर्व गैरकृत्यांचे केंद्र असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

दरम्यान, आरोपी अशोक खरात याला जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 1 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती.

सरकारी वकिलांनी न्यायालयात मांडले की, आरोपी तपासात सहकार्य करत नाही. त्याच्या मोबाईलमधील डेटा आणि संपर्कातील इतर संशयितांची चौकशी अद्याप बाकी आहे. तसेच तक्रारदार महिलांना दिल्या जाणाऱ्या पाण्यात गुंगीकारक द्रव्य मिसळले होते का, याचाही तपास केला जात आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे दूरवर पसरलेले असण्याची शक्यता असल्याने पोलिस आता खरातच्या संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत. पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता असून राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Ashok Kharat : खरात प्रकरणात मोठी कारवाई! शिवनिका संस्थानचा माजी सचिव अटकेत; ३२ बेनामी खात्यांचे फुटले बिंग

2026-05-13 21:35:53

Ashok Kharat : खरात प्रकरणात मोठी कारवाई! शिवनिका संस्थानचा माजी सचिव अटकेत; ३२ बेनामी खात्यांचे फुटले बिंग

Congress News : महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का! अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट 'सस्पेंड'; राजकीय वर्तुळात खळबळ

2026-05-13 19:03:52

Congress News : महाराष्ट्र काँग्रेसला मोठा धक्का! अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट 'सस्पेंड'; राजकीय वर्तुळात खळबळ

Raj Thackeray : गुन्ह्याशी माझा संबंध नाही; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

2026-05-13 18:09:13

Raj Thackeray : गुन्ह्याशी माझा संबंध नाही; रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर

NCP Crisis : राष्ट्रवादीत लवकरच महाभूकंप? भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे ते 22 आमदार कोण? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

2026-05-13 16:57:20

NCP Crisis : राष्ट्रवादीत लवकरच महाभूकंप? भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे ते 22 आमदार कोण? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना मोठा धक्का; भोंदूबाबा खरात प्रकरण भोवणार?

2026-05-12 22:47:02

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांना मोठा धक्का; भोंदूबाबा खरात प्रकरण भोवणार?