NCP Crisis : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (NCP Crisis) तटकरे, पटेल आणि 22 आमदार भाजपमधून लढणार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला की, अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भविष्यात भाजपच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. (NCP Crisis) रोहित पवार म्हणाले, त्या पक्षात नेमकं काय सुरू आहे हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. मात्र, काही निर्णय घेतले जातात आणि नंतर ट्वीट करून त्यात बदल केला जातो. त्यामुळे पक्षात काहीतरी मोठं सुरू असल्याचं दिसत आहे. (NCP Crisis) आसाम दौऱ्यानंतर चर्चांना वेग (NCP Crisis) अलीकडेच सुनेत्रा पवार यांच्या आसाम दौऱ्यादरम्यान सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी वेगळा प्रवास केल्याची चर्चा होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या एका अधिकृत यादीत या दोन्ही नेत्यांची नावे नसल्याचं समोर आलं. या सर्व घटनांमुळे पक्षांतर्गत नाराजी आणि बदलत्या समीकरणांच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. (NCP Crisis) सुनील तटकरेंची भेट अन् वाढलेले तर्कवितर्क (NCP Crisis) याच पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी शरद पवारांची ‘सिल्व्हर ओक’वर भेट घेतली होती. तटकरे यांनी ही भेट केवळ तब्येतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचं सांगितलं असलं तरी या भेटीच्या टायमिंगमुळे अनेक राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (NCP Crisis) राष्ट्रवादीतील नेत्यांकडून पलटवार रोहित पवारांच्या दाव्यानंतर अजित पवार गटातील अनेक नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत, असा आरोप काही नेत्यांनी केला असून पक्षात कोणतीही फूट नसल्याचा दावा करण्यात येत आहे. (NCP Crisis) दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र दिसत असून पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (NCP Crisis) हेही वाचा NCP News : राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल-पार्थ पवार वाद चिघळला? पक्षात खळबळ Rohit Pawar : “खरात प्रकरणातून सुटण्यासाठी आर्थिक रॅकेट” – रोहित पवार