Ashok Kharat : महिला लैंगिक प्रकरणातील मुख्य आरोपी भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्याने एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी केली होती, तब्बल 6 तास त्यांच्याकडून घटनेची माहिती घेत तपास केला होता. (Ashok Kharat) त्यानंतर आता भोंदू खरातच्या प्रकरणात सिन्नर पोलिसांनी शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक केली आहे. (Ashok Kharat) सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली असून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ही अटक झाल्याची माहिती आहे. सिन्नरच्या जगदंबा माता पतसंस्थेत खरातने उघडलेल्या 32 खात्यांना आवारे याची सहमती असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई वेगाने करण्यात आली. खरातच्या कबुलीनंतर सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली. (Ashok Kharat)