Love Triangle; रोहित सराफ, राशा आणि नितांशी दिसणार एकत्र? सिनेमात पाहायला मिळणार लव्हट्रँगल
Love Triangle | एका नव्या सिनेमात लव्हट्रँगल पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडचे स्टारकिडस यात असणार आहेत.
Updated On:

Love Triangle | एका नव्या सिनेमात लव्हट्रँगल पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे बॉलीवूडचे स्टारकिडस यात असणार आहेत.मिड डे रिपोर्टनुसार, ‘नीरजा’ फेम निर्माते अतुल कसबेकर आणि तनुज गर्ग सध्या रोहित सराफ, राशा आणि नितांशी तिघांशी चर्चा करत आहेत.
निर्मात्यांची कलाकारांसोबत असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे म्हंटले जात आहे. ही एक रोमँटिक लव्हस्टोरी असणार आहे. मात्र या सिनेमाचं दिग्दर्शन कोण करणार यावर अद्याप चर्चा सुरू आहे. लवकरच या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा होणार आहे.
रोहितने ‘अल्फा हीरो’पासून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण अलीकडेच रिलीज झालेल्या ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’मध्ये रोहितच्या पुढे वरुण धवन ही फिके पडले होते. तर नितांशीचं ‘लापता लेडीज’मधील अभिनयामुळे खूप कौतुक झालं. ती फक्त १८ वर्षांची आहे. Love Triangle
राशा थडानीने ‘आझाद’मध्ये डान्स आणि अभिनयाचा उत्तम मिश्रण दाखवला. यातील त्याच्या धमाकेदार एन्ट्रीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, रोहितसह नितांशी गोयल आणि राशा थडानी यांच्या त्रिकुटाची कमाल प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पाहावे लागेल. Love Triangle |
हेही वाचा:






