कार्तिक आर्यनच्या ‘नागजिला’मध्ये सान्या मल्होत्राच्या जागी दिसणार ‘लापता लेडीज’ फेम अभिनेत्री ?

NaagZilla Film | अभिनेता कार्तिक आर्यनच्या ‘नागजिला’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. यात कार्तिक इच्छाधारी नागाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटातील एक अपडेट समोर आली आहे. ‘लापता लेडीज’ चित्रपटासाठी अभिनेत्री प्रतिभा रांटाला साईन करण्यात आल्याची चर्चा आहे.
एका अहवालानुसार, नागजिला मधील मुख्य भूमिका साकारण्यासाठी प्रतिभाच्या नावाचा विचार केला जात आहे. आधी या भूमिकेसाठी सान्या मल्होत्रा यांचा विचार केला जात होता, मात्र होऊ शकले नाही. पण अलीकडील घडामोडींवरून असे दिसते की, टीमने आपली शोध मोहीम विस्तारली आहे आणि आता प्रतिभाला यात घेण्याची योजना आखली जात आहे.
मात्र चित्रपटातील एन्ट्रीच्या बातम्या अफवा आहेत आणि अद्याप प्रतिभाशी याबद्दल संपर्क साधलेला नाही, अशी माहिती प्रतिभाच्या टीमकडून सांगण्यात आले आहे. तिला या सिनेमाची ऑफर न मिळाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता ‘नागजिला’मध्ये कार्तिकची अभिनेत्री कोण असेल हे पाहणे रंजक ठरेल. NaagZilla Film |
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी ‘नागझिला’ सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज झालं होतं ज्यात, कार्तिकने निळी जीन्स घातलेली असून तो शर्टलेस पाठमोरा उभा असल्याचे दिसत आहे. तर त्याच्या आजूबाजूला फक्त सापच साप आहेत आणि त्यांच्या अंगावरही साप गुंडाळलेले दिसतात. हा चित्रपट साप आणि माणसाच्या संघर्षावर आधारित विनोदी कथा आहे, ज्यात कार्तिक आर्यन दोन परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. NaagZilla Film |
हेही वाचा:





