Love Triangle : एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या दोन मुली; मुलींच्या टोळक्यांची रस्त्यावरच लाथा-बुक्क्यांनी मारहाण

छत्तीसगड – मुलीच्या प्रेमप्रकरणातून मुला-मुलांमध्ये हाणामारी, रक्तपाताचे अनेक प्रकार घडतात, मात्र छत्तीसगडमधील अंबिकापूरमधून असे प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये एकाच मुलाच्या प्रेमात दोन मुली पडल्या त्यावरून त्यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
एका मुलाच्या प्रेमप्रकरणातून दोन मुलींचे गट एकमेकांना भिडले. एवढेच नाही तर मुलींमध्ये खूप शिवीगाळ झाली आणि प्रकरण चव्हाट्यावर आले. मिळालेल्या माहितीनुसार अंबिकरपूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींच्या गटात रस्त्यावर जोरदार हाणामारी झाली. मुलींच्या या हाणामारीमुळे रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमा झाली. सुरुवातीला लोक दूरवर उभे राहून भांडण बघत राहिले मात्र जेव्हा प्रकरण वाढले तेव्हा स्थानिक लोकांनी दोन्ही गटांना शांत केले. रोडच्या मध्यभागी झालेल्या या भांडणामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
स्थानिक लोकांच्या मते, प्रेमप्रकरणातून मुलींच्या या दोन गटांमध्ये भांडण झाले आहे. एकाच मुलावर दोन मुलींचा जीव जडला आहे. त्यामुळे प्रेमाच्या या त्रिकोणाचे भांडणात रुपांतर झाले आहे. येथील बराम पारा येथे राहणारी एक मुलगी एका मुलावर प्रेम करत असल्याचे स्थानिकांनी माहिती देताना सांगितले आहे. त्याच मुलाच्या प्रेमात शक्ती पारा येथील एक मुलगी देखील प्रेमात पडते. हा प्रकार समजताच दोन्ही मुली संतप्त झाल्या आणि त्यांनी आपापल्या टोळीतील मुलींना बोलावत रस्त्यावरच भांडण करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींच्या हातात लोखंडी साखळीही होत्या. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस कारवाई करण्यात आली नाही.





