शिरूर – शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन, व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला होता. या तक्रारीची दखल घेऊन सा.बां.शिरूर उपविभागाचे सहाय्यक अभियंता अनिल जाधव यांनी स्थळ पाहणी केली होती. आणि निकृष्ट काम ठेकेदाराकडून पुन्हा करण्याचे निर्देश दिले होते, मुळातच हे काम होताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निगराणी खाली होत असते हे अधिकारीच पुणे येथे राहावयास असून त्यांचे कोणत्याच कामाकडे लक्ष नसते त्यामुळे या भागातील अनेक कामे निकृष्ट पद्धतीने होत आहे. वाळुंज यांचा या कामाविषयी सातत्याने पाठपुरावा सुरू होता अखेर नुकतेच सदर काम पुनः करण्यात आले आहे, ही जनहितासाठी महत्त्वाची बाब आहे. “रस्ता पुन्हा करण्यात आल्याने समाधान आहे, परंतु यासाठी पाठपुराव्यामध्ये जनतेचा मौल्यवान वेळ वाया जातो, अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास सर्व सार्वजनिक कामे नियम, तांत्रिक निकष आणि शास्त्रीय पद्धतीनुसार गुणवत्तापूर्ण होतील. जेणेकरून नंतर पच्छाताप होणार नाही. निकृष्ट कामे देशाच्या विकासाला बाधा ठरतात. बांधकाम विभागांनी ‘शासन निर्देशांचे काटेकोर पालन’ करून त्याप्रमाणे कामांपूर्वी फलक लावणे व गुणवत्ता तपासणीवर कठोर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जिथे दुर्लक्ष किंवा गैरप्रकार दिसतील, तिथे जागरूक नागरिक म्हणून आम्ही गप्प बसणार नाही.” या भागात निकृष्ट कामे होतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. – निलेश मंदा यशवंत वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता / व्हिसल ब्लोअर)