ZP Election : भोर नगरपरिषद आरक्षण जाहीर! काही इच्छुकांना धक्का, तर जुन्या चेहरे मैदानात परतण्यास उत्सुक

प्रभात वृत्तसेवा
भोर – भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अनेक उमेदवार इच्छुक असल्याने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण होणार आहे. बुधवारी (दि. ८) रोजी नगरसेवक पदासाठी भोर नगरपरिषदेची प्रभाग निहाय आरक्षण जाहीर झाली असून काही इच्छुकांना अडचण निर्माण झाली आहे तर अनेक विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे.नगरपरिषद सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली.
यावेळी मुख्याधिकारी गजानन शिंदे, शाखा अभियंता खरात, सुमंत शेटे, संदीप शेटे, गणेश पवार, अमित सागळे, पल्लवी फडणीस, केदार देशपांडे, जगदीश किर्वे, सचिन तारू, अतुल काकडे, सोमनाथ ढवळे, उमेश देशमुख, शुभम शेटे, राजेश शिंदे, समीर सागळे, तोसिफ आत्तार, अनुप धोत्रे, तुषार घोडेकर, कुणाल धुमाळ, स्वामी धुमाळ, सचिन कनेहरकर उपस्थित होते. नगरपालिकेचे १० प्रभाग असून प्रत्येक प्रभागामध्ये २ नगरसेवक असणार आहेत.
असे एकूण २० नगरसेवक असणार आहेत. यातील २ जागा अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव यात १ महिला १ पुरुष, ५ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव यात ३ महिलाचा समावेश आहे. ६ जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव तर ७ जागा सर्वसाधारण (खुल्या) गटासाठी आरक्षित झाल्या आहेत, असे एकूण २० जागांसाठी प्रभाग नगरकसेवक आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रभागानुसार आरक्षण..
प्रभाग क्रमांक १ मध्ये (सर्वसाधारण (खुला) एक जागा सर्वसाधारण महिला एक जागा), प्रभाग क्रमांक २ मध्ये एक जागा सर्वसाधारण (खुला), एक जागा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ३ मध्ये एक जागा सर्वसाधारण (खुला ), एक जागा सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा, सर्वसाधारण महिला एक जागा, प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण (खुला) एक जागा, अनुसूचित जाती जमाती महिला एक जागा, प्रभाग क्रमांक ६ मध्ये सर्वसाधारण महिला एक
जागा, अनुसूचित जाती एक जागा, प्रभाग प्रभाग क्रमांक ७ मध्ये सर्वसाधारण महिला एक जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग एक जागा, प्रभाग क्रमांक ८ मध्ये सर्वसाधारण (खुला) एक जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक जागा, प्रभाग क्रमांक ९ मध्ये सर्वसाधारण (खुला) एक जागा, नागरिकांचा महिला एक जागा प्रभाग प्रभाग १० मध्ये सर्वसाधारण (खुला) एक जागा, नागरिकांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक जागा विद्यमान नगरसेवक आशा रोमण, समीर सागळे, अनिल पवार हे प्रभाग क्रमांक ८ मध्ये एकाच प्रभागात आल्यामुळे त्यांची उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
मात्र इतर नगरसेवकांना त्यांचे प्रभाग सर्वसाधारण महिला किंवा सर्वसाधारण झाल्याने पुन्हा निवडणूक लढण्याची संधी निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (ठाकरे गट) या पक्षातील कार्यकर्ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.





