Satara: झेडपी बांधकाम विभागाने गुणवत्तापूर्ण कामे करावीत; ना. शिवेंद्रसिंहराजे
Satara जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा तालुकानिहाय आढावा ना. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. कामांची सद्य:स्थिती, गुणवत्ता, प्रगती आणि प्रलंबित कामांबाबत चर्चा करुन, त्यांनी संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास गतिमान करण्यासोबत सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Satara: जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे केली जातात. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. गुणवत्तापूर्ण विकासकामे करण्यास बांधकाम विभागाने प्राधान्य द्यावे, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिल्या.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कामकाजाचा तालुकानिहाय आढावा ना. शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात घेतला. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, सदस्या ऋतुजा शिंदे, लता कर्णे, अजित साळुंखे, पूजा मोरे, सर्जेराव सावंत, नीता खरात, कामेश कांबळे, अमित चव्हाण, लालासाहेब जगदाळे, रणजित पाटील, मदन काळभोर, हनुमंत जगदाळे, शैलजा शिंदे, प्रियंका साळुंखे, सातारा पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, सदस्य राहुल शिंदे, जावळी पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, बांधकाम विभागाचे सचिव राजभोज, अभियंता हांडे, अभियंता पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा तालुकानिहाय आढावा ना. शिवेंद्रसिंहराजेंनी घेतला. कामांची सद्य:स्थिती, गुणवत्ता, प्रगती आणि प्रलंबित कामांबाबत चर्चा करुन, त्यांनी संबंधित अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा विकास गतिमान करण्यासोबत सर्व कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.





