ICC Player of the month award : झिम्बाब्वेचा ‘सिकंदर रझा’ ठरला सर्वोत्तम खेळाडू

दुबई – आयसीसीने सुरू केलेल्या नव्या पुरस्काराचा मानकरी झिम्बाब्वेचा अफलातून फलंदाज सिकंदर रझा ठरला आहे. आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सरस कामगिरी केलेल्या खेळाडूचा गौरव करण्यात येतो.
रझाने गेल्या महिन्यात भारताविरुद्धच्या मालिकेत सरस कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला ऑगस्ट महिन्याचा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळवणारा रझा हा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मिशेल सॅंटनरला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.
झिम्बाब्वेच्या 36 वर्षांच्या सिकंदरने ऑगस्ट महिन्यात 3 वनडे शतके ठोकली आहेत. त्याने बांगलादेशविरुद्ध दोन आणि भारताविरुद्ध एक शतक फटकावले. भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वेला 290 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्याने ही खेळी केली होती.





