ZIM vs PAK 2nd ODI : पाकच्या सैम अयुबने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज…

ZIM vs PAK 2nd ODI (Saim Ayub) : पाकिस्तान क्रिकेट संघ झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबर रोजी खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांव्यतिरिक्त फलंदाजांनीही चमकदार कामगिरी करत 10 गडी राखून सामना जिंकला. मात्र, या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू सलामीवीर फलंदाज सैम अयुबने आपल्या नावावर असा विक्रम केला जो आजपर्यंत कोणताही फलंदाज करू शकलेला नाही. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडूही ठरला आहे.
Saim Ayub created history….
झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात सैम अयुबने अप्रतिम कामगिरी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. वास्तविक प्रतिस्पर्धी संघानं विजयासाठी दिलेले आव्हान 150 धावसंख्यापेक्षा कमी असताना शतक झळकावण्याचा विक्रम करणारा सॅम अयुब जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. या सामन्यात पाकिस्तानसमोर 146 धावांचे आव्हान होते आणि अशा स्थितीत त्यानं वघ्या 62 चेंडूंचा सामना करताना 17 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने नाबाद 113 धावा केल्या. पाकिस्तानी फलंदाजाने 182.25 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करून एकदिवसीय सामन्याचे T20 मध्ये रूपांतर केले.
1️⃣1️⃣3️⃣ not out
6️⃣2️⃣ balls
1️⃣7️⃣ fours
3️⃣ sixes@SaimAyub7‘s whirlwind maiden ODI 💯 earns him the player of the match award 🏆#ZIMvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/sI3s0f1XpJ— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 26, 2024
पाकिस्तान 10 विकेट्सनं विजयी…
प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 32.3 षटकात 145 धावा केल्या होत्या. यजमान संघाच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. प्रत्युत्तरात 146 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानने एकही विकेट न गमावता 18.2 षटकांत सामना जिंकला. शतकवीर सैम अयूब सामन्याचा मानकरी ठरला.
या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार पहिल्या वनडेत पाकिस्तानला झिम्बाब्वेकडून 80 धावांनी लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता. आता पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना बुलावायो येथे 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे.





