IND vs PAK : हार्दिक पंड्याची कमाल! पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू

IND vs PAK Hardik Pandya’s Historic Feat : आशिया कप २०२५ मधील बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना सध्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगला आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय आतापर्यंत चुकीचा ठरताना दिसत आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने सामन्याच्या पहिल्या षटकातील पहिल्याच कायदेशीर चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर सैम अयूबला बाद करत इतिहास रचला.
हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी –
हार्दिक पंड्याने सामन्याच्या पहिल्या षटकात गोलंदाजी करताना पहिला चेंडू लेग साईडला टाकला, जो पंचांनी वाईड ठरवला. त्यानंतर दुसऱ्या कायदेशीर चेंडूवर त्याने सैम अयुबला जसप्रीत बुमराहच्या हाती झेलबाद केले. सैम अयुब शून्य धावांवर (गोल्डन डक) बाद झाला. या कामगिरीसह हार्दिक पंड्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात डावाच्या पहिल्या कायदेशीर चेंडूवर विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी अर्शदीप सिंगने टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये अमेरिकेविरुद्ध सामन्यात पहिल्या चेंडूवर शायन जहांगीरला बाद करत हा पराक्रम केला होता.
हार्दिकने क्रिकेट इतिहासात जोडला एक नवा अध्याय-
Saim Ayub goes for a duck 🏏
– What a start for India#INDvsPAK #SaimAyub #hardikpandya #AsiaCup2025 pic.twitter.com/Wuu1w2x8Z2
— CricketTimes.com (@CricketTimesHQ) September 14, 2025
या विकेटसह, हार्दिकने सामन्यात भारताला सुरुवातीची आघाडी मिळवून दिलीच, शिवाय एक अनोखा विक्रमही आपल्या नावावर केला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर एखाद्या भारतीय गोलंदाजाने विकेट घेतल्याची ही पहिलीच वेळ होती. यासोबत हार्दिकने क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय जोडला. पाकिस्तानचा सलामीवीर सैम अयुब हा सलग दुसऱ्यांदा गोल्डन डक ठरला. यापूर्वी ओमानविरुद्ध सामन्यातही तो शून्य धावांवर बाद झाला होता. त्या सामन्यात शाह फैजलने त्याला एलबीडब्ल्यू केले होते.
हेही वाचा – IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी तणाव! दोन्ही कर्णधारांनी ना हात मिळवला, ना भिडवली नजर
दोन्ही संघांत कोणतेही बदल नाहीत –
या सामन्यासाठी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. भारताने अर्शदीप सिंगला या सामन्यात संधी दिली नाही, तर पाकिस्ताननेही आपला वेगवान गोलंदाज हॅरिस रौफला संघात स्थान दिले नाही. सैम अयुबच्या बाद झाल्यानंतर मोहम्मद हॅरिसलाही विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने ५ चेंडूत ३ धावा करत आपली विकेट गमावली.





