IND vs PAK : ‘दाखवून दे! माझ्यामुळे तुझ्या कामगिरीवर परिणाम झाला नाही’, सैम अयूबला खास मैत्रिणीने पाठवला VIDEO मेसेज

IND vs PAK Saim Ayub Video message from his friend Kashaf Ali : या कप 2025च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक लढत होणार आहे. मागील दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. आता पुन्हा एकदा विजेतेपदाच्या लढतीत भारताचा संघ प्रबळ मानला जात आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर काशफ अलीने सैम अयूबला खास विनंती केली आहे, ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
काशफ अलीचा सैम अय्यूबसाठी खास संदेश –
काशफ अलीने सैम अय्यूबसाठी एक व्हिडीओ संदेश शेअर केला आहे. यात ती म्हणाली, “पाकिस्तान आणि भारत यांच्यातील हा अंतिम सामना आहे. माझ्या सर्व शुभेच्छा आपल्या संघासोबत आहेत. सैम अय्यूब, कृपया लोकांना सांग की माझ्यामुळे तुझ्या कामगिरीवर कोणताही परिणाम झालेला नाही. जा आणि मैदानावर षटकारांचा वर्षाव कर. आम्हाला निराश करू नको. आमच्या, पाकिस्तानी लोकांच्या, छोट्या-छोट्या आनंदाला तू हिरावून घेऊ नकोस.”
“Saim, let everyone know your performance isn’t affected because of me!” — Social Media influencer Kashaf Ali clears the air ahead of the big match against India in the Asia Cup Final. #TOKInAsiaCup #PAKvIND #KashafAli pic.twitter.com/VsWTHzkFc0
— TOK Sports (@TOKSports021) September 28, 2025
सैम अय्यूबची निराशाजनक कामगिरी –
या आशिया कपमध्ये सैम अय्यूबची फलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्याने 6 सामन्यांमध्ये केवळ 23 धावा केल्या असून त्याची सरासरी 3.83 इतकी आहे. विशेष म्हणजे, तो चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. दुसरीकडे, गोलंदाजीत मात्र सैम अय्यूबने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 8 विकेट्स घेतल्या असून त्याचा इकॉनॉमी रेट 6.58 धावा प्रति षटक आहे. तरीही, पाकिस्तानी चाहते सैम अय्यूबला त्याच्या फलंदाजीमुळे ओळखतात आणि या स्पर्धेत तो क्रीझवर टिकण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे.
दुबई पोलिसांनी जाहीर केली नियमावली –
आशिया कप 2025 चा अंतिम सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी दुबई पोलिसांनी विशेष सूचना जारी केल्या आहेत. सामना भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार असून, प्रेक्षकांना किमान तीन तास आधी स्टेडियममध्ये पोहोचण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एका तिकिटावर केवळ एकाच व्यक्तीला प्रवेश मिळेल आणि सामन्यादरम्यान स्टेडियममधून बाहेर पडल्यास पुन्हा प्रवेश मिळणार नाही. प्रेक्षकांना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





