IND vs PAK : ‘शाहिद आफ्रिदीसारखं खेळणं थांबवा…’, पराभवानंतर आपापसात भिडले पाकिस्तानी, कोणावर फाटलं बिल?

शाहिद आफ्रिदीची टीका आणि सल्ला –
पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनी संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याने सैम अयुबला आपल्या खेळात सुधारणा करण्याचा सल्ला दिला. अफ्रिदी म्हणाला, “सैम अयुबने शांतपणे खेळावे आणि मैदानावरील परिस्थिती समजून रणनीती आखावी. तो पहिल्याच चेंडूपासून शाहिद अफ्रिदीसारखा खेळण्याचा प्रयत्न करतो, जे चुकीचे आहे.” अयुबने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या, परंतु पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बाद होऊन संघाला धक्का बसला. आफ्रिदीनी संघ निवडीवरही प्रश्न उपस्थित केले आणि गोलंदाजांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तानची कमकुवत गोलंदाजी –
पाकिस्तानने या सामन्यात फक्त एकच वेगवान गोलंदाज शाहीन शाह अफरीदी याला संधी दिली. शाहीनने फलंदाजीत चमक दाखवत 16 चेंडूंमध्ये 33 धावा केल्या, परंतु गोलंदाजीत भारतीय फलंदाजांवर दबाव टाकण्यात तो अपयशी ठरला. आफ्रिदी म्हणाला, “संघात चांगल्या वेगवान गोलंदाजांची कमतरता आहे. सध्याच्या संघात असा एकही फलंदाज नाही जो सामना जिंकवू शकेल. चांगल्या गोलंदाजांना विश्रांती देण्याचा निर्णय भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध काम करत नाही.”
भारताची सुपर फोरमध्ये दणक्यात एन्ट्री –
या विजयासह भारतीय संघ चार गुणांसह सुपर फोरमध्ये दाखल झाला असून गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. दुबईच्या खेळपट्टीवर पाकिस्तानी फलंदाजांना संघर्ष करावा लागला, तर भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये वर्चस्व राखले. सैम अयुबच्या सातत्यपूर्ण अपयशामुळे त्याच्यावर टीकेची झोड उठली असून, त्याला आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.





