\n

यासह झिम्बाब्वे संघानं मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आज झिम्बाब्वे ज्या पद्धतीने खेळला त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्येही पाकिस्तानी संघाचा पर्दाफाश झाला आहे. मालिकेत अजून दोन सामने बाकी आहेत. जे पाकिस्तानला कोणत्याही किंमतीवर जिंकावे लागेल. मालिकेतील दुसरा सामना 26 नोव्हेंबरला तर मालिकेतील शेवटचा आणि तिसरा सामना 28 नोव्हेंबरला होणार आहे.

\n

पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना केवळ 205 धावा केल्या. संघाला केवळ 40.2 षटके खेळता आली. एकेकाळी झिम्बाब्वेच्या 7 विकेट केवळ 125 धावांवर पडल्या होत्या, पण त्यानंतरही संघाने धावसंख्या 200 च्या पुढे नेली. नवव्या क्रमांकावर आलेल्या एन्गरावांने 48 धावांची खेळी केली तर त्याआधी सिकंदर रझाने 39 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फैसल अक्रम आणि सलमान अली आगा यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले, तर हरिस रौफ, आमिर जमाल आणि मोहम्मद हसनैन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

\n

प्रत्युत्ततरात पाकिस्तानी संघ हा सामना आरामात जिंकेल असे वाटत होते, पण पाकिस्तानचे फलंदाज फेल ठरले आणि त्यांना पुन्हा एकदा लाजीरवाण्या पराभवला सामोरं जावं लागले. पाकिस्तानने फलंदाजीला सुरुवात केली तेव्हा संघाला 21 षटकांत 6 विकेट गमावून केवळ 60 धावा करता आल्या. दरम्यान पाऊस पडला आणि सामना थांबवावा लागला. पाऊस थांबला नाही तेव्हा झिम्बाब्वे संघाला डकवर्थ लुईस नियमानुसार 80 धावानं विजयी घोषीत करण्यात आले. पाकचे कामरान गुलाम (17), सैम अयुब (11), अब्दुल्ला शफीक (01), इरफान खान (07), आगा सलमान (04) आणि हसीबुल्ला खान (0) हे फलंदाज स्वस्तात बाद झाले तर मोहम्मद रिझवान 19 वर तर आमेर जमाल खाते न उघडता नाबाद राहिला. कर्णधार मोहम्मद रिझवानने निश्चितपणे नाबाद 19* धावा केल्या, परंतु त्याने केवळ 44.19 च्या स्ट्राइक रेटने 43 चेंडूत धावा जोडल्या.

\n

झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुझाराबानी, सीन विल्यम्स आणि सिकंदर रझा यांनी गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. मुजरबानीने अवघ्या 9 धावांत 2 बळी घेतले, तर सीन विल्यम्स आणि सिकंदर रझा यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले. झिम्बाब्वेची अचूक गोलंदाजी आणि शिस्तबद्ध क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळाली नाही.

\n

IND vs AUS 1st Test : तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, कोहलीचे दमदार शतक अन् टीम इंडिया विजयापासून 7 विकेट दूर….

\n

\n

झिम्बाब्वेविरुद्ध 9 वर्षांनंतर पराभव

\n

पाकिस्तानचा संघ तब्बल 9 वर्षांनंतर झिम्बाब्वेकडून एकदिवसीय सामना हरला आहे. 2015 मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानचा शेवटचा पराभव केला होता. 2020 मध्ये दोन्ही संघांमधील एक वनडे सामना बरोबरीत सुटला होता. पाकिस्तान संघाने झिम्बाब्वेमध्ये 4 सामने गमावले आहेत. बुलावायोच्या मैदानावर पाकिस्तान पहिल्यांदाच हरला आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"ZIM vs PAK 1st ODI : पाकिस्तानचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी मिळवला विजय…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/zim.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/zim-vs-pak-1st-odi-zimbabwe-win-the-first-odi-by-80-runs-on-dls-method#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/zim.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/zim-vs-pak-1st-odi-zimbabwe-win-the-first-odi-by-80-runs-on-dls-method#webpage","name":"ZIM vs PAK 1st ODI : पाकिस्तानचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी मिळवला विजय…","url":"https://www.dainikprabhat.com/zim-vs-pak-1st-odi-zimbabwe-win-the-first-odi-by-80-runs-on-dls-method","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/zim-vs-pak-1st-odi-zimbabwe-win-the-first-odi-by-80-runs-on-dls-method#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/11/zim.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/zim-vs-pak-1st-odi-zimbabwe-win-the-first-odi-by-80-runs-on-dls-method#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/zim-vs-pak-1st-odi-zimbabwe-win-the-first-odi-by-80-runs-on-dls-method","name":"ZIM vs PAK 1st ODI : पाकिस्तानचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी मिळवला विजय…"}}]}}}

ZIM vs PAK 1st ODI : पाकिस्तानचा पुन्हा एकदा लाजीरवाणा पराभव, झिम्बाब्वेने 80 धावांनी मिळवला विजय…