“युक्रेन स्वातंत्र्यासाठी लढा देणार, त्यासाठी पुतिनला थांबवावे लागेल” ; वोलोदिमिर झेलेन्स्की अमेरिकेत दाखल

Zelensky-Trump meeting। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी ते अमेरिकेत दाखल झालर आहेत. त्यांनी याविषयी स्वतः माहिती दिली. त्यांनी आपण वॉशिंग्टनला पोहोचलो असून आज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेटघेणार आहोत” असे त्यांनी म्हटले. या काळात ते युरोपीय नेत्यांशीही चर्चा करतील.
‘शांतता कायमची असावी’ Zelensky-Trump meeting।
झेलेन्स्की यांनी आमंत्रण दिल्याबद्दल अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानले. तसेच याविषयी बोलताना त्यांनी, ‘आपल्या सर्वांना आशा आहे की हे युद्ध लवकर आणि सुरक्षितपणे संपेल. आणि शांतता कायमची असावी, पूर्वीसारखी नाही, जेव्हा युक्रेनला क्रिमिया आणि त्याचा पूर्व भाग – डोनबास सोडण्यास भाग पाडले गेले होते. पुतिन यांनी ते नवीन हल्ल्याच्या तयारीसाठी एक तळ बनवले.’असे त्यांनी म्हटले.
‘आम्हाला आधीही सुरक्षा हमी देण्यात आल्या होत्या’
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, ‘१९९४ मध्ये युक्रेनला तथाकथित ‘सुरक्षा हमी’ देण्यात आल्या होत्या, परंतु त्यांचा काही उपयोग झाला नाही.’असरे म्हटले आहे. तसेच झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे सांगितले की,” २०२२ नंतर युक्रेनियन लोकांनी कीव, ओडेसा किंवा खार्किव्ह सोडले नाही त्याचप्रमाणे क्रिमिया कधीही सोडला जाऊ नये.”
‘रशियाने हे युद्ध संपवले पाहिजे’ Zelensky-Trump meeting।
पुढे ते म्हणाले, ‘युक्रेनियन त्यांच्या देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. आता आमचे सैनिक डोनेस्तक आणि सुमी प्रदेशात यश मिळवत आहेत. मला खात्री आहे की आम्ही युक्रेनचे रक्षण करू, सुरक्षा सुनिश्चित करू आणि आमचे लोक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, अमेरिकेचे नागरिक आणि प्रत्येक भागीदार आणि सहयोगी यांच्या पाठिंब्याबद्दल आणि मदतीबद्दल नेहमीच आभारी राहतील.’
पुढे वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी, ‘रशियाने हे युद्ध संपवले पाहिजे, कारण त्याने ते सुरू केले आहे. मला आशा आहे की अमेरिका आणि युरोपियन मित्रांसह आमची सामान्य शक्ती रशियाला खरी शांतता प्रस्थापित करण्यास भाग पाडेल.’असे त्यांनी म्हटले.





