Russia ukraine war : रशियाच्या माऱ्यात युक्रेनमध्ये ८ जखमी; झेलेन्स्की यांचा प्रत्युत्तराचा इशारा
ओडेसा शहरातल्या २४ मजली इमारतीला लक्ष्य केले गेले. तर राजधानी कीव्हवर सलग सातव्या दिवशी ड्रोनचा मारा केला गेला.

Russia ukraine war – रशियाने रात्री युक्रेनची राजधानी कीव्ह आणि ओडेसा शहरांमध्ये केलेल्या माऱ्यात एक रहिवासी अपार्टमेंट उद्ध्व्सत झाली असून किमान आठ जण जखमी झाले आहेत.
रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की या दोघांनीही मंगळवारी परस्परांच्या देशांवर जोरदार हवाई हल्ले करण्याचे इशारे दिले होते.
झेलेन्स्की यांनी रशियाच्या हवाई हद्दीतून जाणारी विमाने देखील सुरक्षित राहू शकणार नाही, असे म्हटले आहे. त्यावर आम्ही दहशतवाद्यांशी वाटाघाटी करत नाही, असे उत्तर पुतीन यांनी दिले आहे.
युक्रेनला ब्रिटनकडून शस्त्रांची मदत होते आहे. त्यामुळे रशियाकडून ब्रिटनच्या ठिकाणांवरही लक्ष्य केले जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त होतो आहे.
यासंदर्भात पुतीन यांना प्रश्न विचारला असता, हे लष्करी सिक्रेट आहे, असे उत्तर त्यांनी दिले. तर गेल्या महिन्यात जर्मनीच्या लेपझिंग, हॅले विमानतळावर झालेला ड्रोन हल्ला रशियानेच केल्याचा आरोप जर्मनीने केला आहे.
रशियाने मंगळवारी रात्री युक्रेनवर १७४ ड्रोनचा मारा केला. त्यातील निम्मी जेट पॉवर ड्रोन होती. ही ड्रोन रोखणे अवघड असते. याशिवाय दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि विमानातू सोडलेली दोन क्षेपणास्त्रेही डागली गेली.
ओडेसा शहरातल्या २४ मजली इमारतीला लक्ष्य केले गेले. तर राजधानी कीव्हवर सलग सातव्या दिवशी ड्रोनचा मारा केला गेला.





