Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत घडामोडींना वेग आला असून, पक्षाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्या विधान परिषद आमदारकीभोवती आता कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी देण्यात आलेल्या एबी फॉर्मवरील सहीमुळे हा संपूर्ण पेच निर्माण झाला आहे. (Maharashtra Politics) झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर खासदार सुनील तटकरे यांनी ‘प्रदेशाध्यक्ष’ या नात्याने सही केल्याचं समोर आलं आहे. मात्र, त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नावाने निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रामुळे या सहीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Maharashtra Politics) सूत्रांच्या माहितीनुसार, 29 एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर ‘प्रदेशाध्यक्ष’ असा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. तसेच पक्षाकडून होणारा अधिकृत पत्रव्यवहार अंतिम मानावा, असंही त्या पत्रात स्पष्ट करण्यात आलं होतं. यानंतर अवघ्या एका दिवसाने, म्हणजे 30 एप्रिलला झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर तटकरे यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून सही केल्याचं समोर आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे. (Maharashtra Politics) दरम्यान, या प्रकरणावर निवडणूक प्रक्रियेदरम्यान आक्षेप घेतला गेला, तर झिशान सिद्दीकी यांच्या आमदारकीवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे अजित पवार गटासाठी ही डोकेदुखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics) याचवेळी अजित पवार गटातील काही आमदारांनी शरद पवारांकडे मदतीसाठी धाव घेतल्याची माहितीही समोर येत आहे. पक्षात सुरू असलेल्या संभाव्य फेरबदलांमुळे अनेक नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जात असून, या पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील एका वरिष्ठ नेत्यानेही या हालचालींना दुजोरा दिल्याचं सांगितलं जात आहे. (Maharashtra Politics) हेही वाचा NCP News : तांत्रिक चूक की शीतयुद्धाला सुरुवात? राष्ट्रवादीच्या यादीतून तटकरे, पटेलांची पदे पुन्हा गायब