Team India’s Davis Cup : प्रशिक्षक झीशान अलींचा राजीनामा….

Zeeshan Ali resigns as India’s Davis Cup coach :- भारतीय डेव्हिस कप संघाचे प्रशिक्षक झीशान अली यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताला स्टॉकहोममध्ये स्वीडनविरुद्ध सामना खेळायचा आहे, मात्र त्याआधीच झीशान यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे.
54 वर्षीय जीशान 2013 मध्ये नवी दिल्लीत दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी नंदन बल यांच्या जागी संघाचे प्रशिक्षक बनले होते. भारतीय संघ 14-15 सप्टेंबर रोजी स्टॉकहोममधील हार्ड इनडोअर कोर्टवर स्वीडनचा सामना करणार आहे.
Paris Olympics 2024 : आंदोलनामुळे कुस्तीपटूंची खराब कामगिरी – संजय सिंग
झीशान म्हणाले, “मी 11 वर्षे डेव्हिस कप संघाचा प्रशिक्षक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध पाकिस्तानमध्ये झालेल्या ऐतिहासिक सामन्यात मी डेव्हिस कप संघाचा कर्णधारही होतो. या तिन्ही गोष्टी एकत्रित करण्याचा मान देशात अन्य कोणाला मिळाला असेल असे मला वाटत नाही. परंतू मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे”, असेही त्यांनी यावेळी म्हटले.





