Davis Cup 2024 : इटलीने सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर केला कब्जा, अंतिम फेरीत नेदरलँड्सला केलं पराभूत…

Davis Cup 2024 : इटलीने डेव्हिस कप विजेतेपदासाठी एकेकाळी जवळपास 40 पेक्षा अधिक वर्षे वाट पाहिली होती परंतु यंदा स्टार खेळाडू यानिक सिनरच्या उपस्थितीत रविवारी (24 नोव्हेंबर) या प्रतिष्ठित टेनिस पुरुष सांघिक स्पर्धेचे इटलीनं सलग दुसरे विजेतेपद पटकावले आहे. इटलीने याआधी मागील वर्षी(2023) आॅस्ट्रेलियाला पराभूत करताना तर 1976 ला चिलीला पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
ITALY CONTINUE THEIR REIGN AS WORLD CHAMPIONS 🇮🇹@janniksin takes down Griekspoor 7-6(2) 6-2 to retain the #DavisCup for @federtennis 🏆 pic.twitter.com/Ah1tCx7oUN
— Davis Cup (@DavisCup) November 24, 2024
अंतिम फेरीत जगातील नंबर वन सिनरने टॅलोन ग्रीक्सपूरचा 7-6, 6-2 असा पराभव करत इटलीला नेदरलँड्सवर 2-0 असा विजय मिळवून दिला आणि विजेतेपदासह त्याच्या शानदार हंगामाचा शेवट केला. तत्पूर्वी, मॅटिओ बेरेटिनीने बॉटिक व्हॅन डी गेंडस्कल्पचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत इटलीला चांगली सुरुवात करून देताना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली होती.
अंदाजे 9,200 चाहत्यांसमोर, 2012 आणि 2013 मध्ये चेक प्रजासत्ताक नंतर दोनदा डेव्हिस कप जिंकणारा इटली हा पहिला संघ ठरला आहे . दुसरीकडे इटलीच्या महिला संघानेही बुधवारी स्लोव्हाकियाचा पराभव करून ‘बिली जीन किंग’ कप जिंकला आहे.
China Masters 2024 : ‘सात्विक-चिराग’ला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात…
स्पर्धेची अंतिम फेरी ही मलागा (स्पेन) येथे पार पडली आणि सिन्नरने मलागामधील त्याचे चारही सामने जिंकले, ज्यात उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिना विरुद्ध बेरेटिनीसह दुहेरीचा सामनाही समाविष्ट आहे.विजेतेपदानंतर सिनर म्हणाला की, “डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून पुनरागमन करणे आणि पुन्हा विजेतेपद जिंकणे, ही आम्हा सर्वांसाठी सर्वात चांगली भावना आहे. ही ट्रॉफी उचलताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”





