Maharashtra Politics : अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा महाविकास आघाडीसोबत येणार? ‘या’ नेत्याच्या विधानाने खळबळ
Maharashtra Politics : युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणावर मोठे विधान केले आहे. अजित पवारांनी महायुती सोडल्यास ते पुन्हा आघाडीत येऊ शकतात, असे त्यांनी म्हटले.

Maharashtra Politics : राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना युगेंद्र पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने महायुतीची साथ सोडल्यास ते पुन्हा महाविकास आघाडीसोबत येऊ शकतात, असा दावा त्यांनी केला आहे. (Maharashtra Politics)
बारामती आणि राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकांनंतर राजकीय समीकरणांवर चर्चा सुरू आहे. बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून मजबूत उमेदवार न दिल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यावर बोलताना युगेंद्र पवार यांनी मोठ्या मताधिक्याचा अंदाज व्यक्त केला. (Maharashtra Politics)
“बारामतीत सुमारे २ लाख २४ हजार मतदान झाले असून त्यापैकी सुमारे २ लाख २० हजार मतांनी सुनेत्रा पवार विजयी होतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांविरुद्ध उभे राहू नयेत, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. (Maharashtra Politics)
सुप्रिया सुळे यांनीही ‘पवार विरुद्ध पवार’ लढत टाळण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना युगेंद्र पवार म्हणाले की, कुटुंब एकत्र राहणे महत्त्वाचे आहे आणि अशा प्रकारच्या लढती टाळल्या पाहिजेत. (Maharashtra Politics)
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भातही त्यांनी प्रतिक्रिया देत सखोल चौकशीची मागणी केली. डीजीसीएच्या अहवालात काही त्रुटी असल्याचे नमूद करत सत्य समोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Maharashtra Politics)





