Sunetra Pawar : बारामती पोटनिवडणुकीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या निधनाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी केली. “अपघाताबाबत जशा तुमच्या मनात शंका आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत. त्या दूर व्हायलाच हव्यात,” असं त्या भावूक होऊन म्हणाल्या. (Sunetra Pawar) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. “केंद्र आणि राज्य सरकारने सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिले असून, सत्य समोर यायलाच हवे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. (Sunetra Pawar) भाषणादरम्यान अजित पवारांविषयी बोलताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी त्यांच्या स्मृती जपण्यासाठी बारामतीत भव्य स्मारक आणि संग्रहालय उभारण्याची घोषणाही केली. “दादांच्या आयुष्याचा संपूर्ण प्रवास यात मांडला जाईल,” असं त्या म्हणाल्या. (Sunetra Pawar) यावेळी त्यांनी बारामतीकरांना आश्वासन देताना सांगितले की, “अजितदादांनी सुरू केलेली विकासकामे पूर्ण केली जातील. पाणी योजना, शाळा, आरोग्य सुविधा आणि कॅन्सर रुग्णालयासारखी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र काम करेन.” “बारामती माझं कुटुंब आहे. दादांप्रमाणेच तुमचा विश्वास जपण्याचा प्रयत्न करेन,” असे भावनिक आवाहन करत त्यांनी मतदारांचा पाठिंबा मागितला. (Sunetra Pawar)