YouTuber Elvish Yadav : युट्यूबर एल्विश यादव अडचणीत, गुन्हा दाखल
Updated On:

इटानगर : अरुणाचल प्रदेश राज्य महिला आयोगाने माजी मिस अरुणाचल आणि बिग बॉस स्पर्धक मिस चुम दरंग यांच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याबद्दल युट्यूबर एल्विश यादवविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. दुसरीकडे, जयपूरमधील जवाहर सर्कलजवळ बनवलेला एल्विश यादवचा व्हिडिओ वादात सापडला आहे.
या व्हिडिओमध्ये, एल्विशच्या गाडीच्या पुढे पोलिसांचे वाहन जाताना दिसत आहे. एल्विशने ९ जानेवारी रोजी ट्विट केले, ज्यामध्ये पोलिसांची गाडी त्याला एस्कॉर्ट करत असल्याचे वर्णन केले. पोलिस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी एल्विशला एस्कॉर्ट दिल्याचा दावा फेटाळला होता. असे बनावट व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, असे सांगितले. मंगळवारी सायबर पोलिस स्टेशनने एल्विशविरुद्ध गुन्हा दाखल केला.





