Pune Police : कोथरूड पोलिसांकडून रूपेश मारणेला अटक
Updated On:

पुणे : कोथरूड पोलिस ठाण्याच्या पथकाने आज पहाटे मुळशी परिसरात कारवाई करून कुख्यात गुंड रूपेश मारणे याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मारणे हा काही दिवसांपासून फरार होता.
त्याच्या हालचालीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी सापळा रचला. पहाटेच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली.
या कारवाईत पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक सहभागी होते. मारणे याच्याविरुद्ध पुणे शहरासह परिसरातील विविध गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास कोथरूड पोलिस करत आहेत.





