‘म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?’; चाहत्याचा प्रश्न अन् झरीनने दिले सडेतोड उत्तर

Zareen Khan | बॉलीवूड अभिनेत्री झरीन खानला ‘वीर’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यात ती
सलमान खानसोबत झळकली होती. सध्या ती सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
दरम्यान, ३८ वर्षीय झरीन अद्यापही सिंगल आहे. तिने लग्न न केल्याने एका चाहत्याने तिला थेट ‘म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?’ असा सवाल केला. यावर झरीनने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
चाहत्याने केलेल्या कमेंटवर झरीन म्हणाली, ‘लग्न करुन मी काय तरुण होणारे का? आज काल लग्न फार काळ टिकत नाहीत. अनेक जण फक्त दोन-तीन महिने एकत्र राहतात आणि मग वेगळे होतात. नातेसंबंधांमध्ये सच्चेपणा, समजूत आणि समर्पणाची कमतरता आहे. लोक आता स्वाइप करून नाती निवडतात, जणू काही खाद्यपदार्थ मागवत आहोत. यात माणसाची किंमतच उरलेली नाही.’ Zareen Khan |
View this post on Instagram
पुढे झरीनने सांगितलं की, ‘मला अद्याप असा कोणी भेटलेला नाही, ज्याच्यासोबत आयुष्य घालवावं असं वाटेल. आपल्या समाजातील पालकांना सर्वांत मोठी भीती असते की, मूल हाताबाहेर गेले आहे, तर त्यावर उपाय म्हणजे त्यांचे लग्न करणे. लग्न म्हणजे काही जादू आहे का की, जर तुम्ही त्यांचे लग्न केले, तर सर्व काही ठीक होईल. कारण आजकाल बहुतेक लग्न दोन-तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत. मला वाटत नाही की लग्न हा सर्व समस्यांवर उपाय आहे.’ Zareen Khan |
‘मी कुठल्याही दबावाखाली लग्न करणार नाही. लग्नाबाबत घरच्यांनी माझ्यावर फारसा दबाव टाकलेला नाही. मात्र तिची आई अधूनमधून लग्नाची आठवण करून देते. आई म्हणते, तू आता लग्न कर, पण मी तिला सांगते की मला अजून वेळ हवा आहे,” असेही झरीनने स्पष्ट केले आहे.
झरीन खान बिग बॉस स्पर्धक शिवाशीष मिश्राबरोबर तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये होती. परंतु २०२४ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
हेही वाचा :





