Sonam Kapoor : किती गोंडस! सोनम कपूरने चाहत्यांना दाखवली बाळाची झलक; सोशल मीडियावरील खास पोस्टमध्ये काय म्हणाली?
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने आपल्या बाळाची झलक पोस्टद्वारे शेअर केली आहे.

Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूर हिने नुकतीच सोशल मीडियावर आपल्या नवजात बाळाची एक गोड झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्टसोबत तिने एक भावनिक संदेश लिहून ज्या रुग्णालयात बाळाचा जन्म झाला त्या रुग्णालयाचे मनापासून आभार मानले आहेत.
तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे. सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांनी 29 मार्च रोजी त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले. या आनंदाच्या क्षणामुळे दोघेही खूप खुश आहेत.
तसेच दुसऱ्या बाळाच्या आगमनाने आहुजा आणि कपूर या दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. सोनमने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या खास पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती आपल्या बाळाला कवेत घेऊन हॉस्पिटलच्या बेडवर दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जेवण करताना दिसते. हे दोन्ही फोटो रुग्णालयातीलच आहेत.
View this post on Instagram
तिने आपल्या पोस्टमध्ये बाळाच्या जन्मावेळी मदत करणाऱ्या डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमचे विशेष कौतुक केले आहे. तसेच रुग्णालयाने दिलेल्या उत्कृष्ट सेवेसाठी तिने त्यांचे आभार मानले आहेत.
याआधीही सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून त्यांच्या बाळाच्या आगमनाची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
सोनम कपूर ही अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी आहे. वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकत तिने अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हेही वाचा : Eye Care: डोळ्यांत जळजळ आणि खाज? उन्हाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या सोप्या टिप्स जरूर वापरा





