Young Cricketer Death : नियतीचा क्रूर खेळ ! सामना रंगात आला असताना क्रिकेटपटूचा हार्ट अटॅकने मृत्यू
स्थानिक क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव आणि 'युवा स्पोर्ट्स'चे मालक प्रवीण बबन पवार यांचे (Young Cricketer Death) क्रिकेट सामना खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले.

Young Cricketer Death : स्थानिक क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव आणि ‘युवा स्पोर्ट्स’चे मालक प्रवीण बबन पवार (वय ४०, रा. पोमेंडी बुद्रुक) यांचे (Young Cricketer Death) क्रिकेट सामना खेळताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अकाली निधन झाले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी येथे घडली.
सामना लाइव्ह प्रसारित होत असतानाच ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चिंचखरी येथे सुरू असलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत प्रवीण पवार फलंदाजी करत होते. सहकारी खेळाडूने (Young Cricketer Death) चेंडू मारल्यानंतर धाव घेत परत येत असताना अचानक त्यांना तीव्र चक्कर आली आणि ते पंचांसमोरच जमिनीवर कोसळले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे, त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. घटनेच्या ठिकाणी उपस्थित खेळाडू आणि इतर लोकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांना दुसरा झटका आला आणि वैद्यकीय उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
ही संपूर्ण घटना सामन्याच्या लाइव्ह प्रक्षेपणात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.प्रवीण पवार हे रत्नागिरी शहरातील मारुती मंदिराजवळ ‘युवा स्पोर्ट्स’ हे स्पोर्ट्स सामानाचे दुकान चालवत होते. ते उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून परिसरात ओळखले जात होते.
टेनिस क्रिकेटसह स्थानिक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकदा उत्कृष्ट कामगिरी केली होती.काही काळ पत्रकारितेतही त्यांनी काम केले होते. त्यांच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते आणि आता त्यांचे निधन झाल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रवीण पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरीतील क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली असून, क्रीडाप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.






