Sachin Pilgaonkar post : “…कशी छाप सोडू शकते हे तू दाखवून दिलं”; मंडला मंडर्स पाहिल्यावर सचिन पिळगावकरांची मुलीसाठी खास पोस्ट

Sachin Pilgaonkar post : नुकतीच नेटफिक्ल्स या ओटीटीवर मंडला मर्डस नावाची नवीकोरी वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेबसिरीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिरीजमधील कास्टचं कौतुक केले जात आहे. या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री वाणी कपूर ही मुख्य भूमिकते आहे.
तर मराठमोळी अभिनेत्री श्रेया पिळगावकर हिची देखील महत्वाची भूमिका आहे. तिने साकरलेली रुक्मिणीने प्रेक्षकांची मनं जिंकली असून, तिचे पिता म्हणजे मराठी इंडस्ट्रीतील महागुरू सचिन पिळगावकर यांनी मुलीविषयी खास पोस्ट शेअर करत तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
सचिन व सुप्रिया यांनी नुकतीच ‘मंडला मर्डर्स’ ही वेबसीरिज पाहिली आहे. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर लेकीचं कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे “तुला जे काही प्रेम मिळत आहे त्यासाठी अभिनंदन श्रिया. तू साकारलेल्या प्रत्येक भूमिकेतून तुझी क्षमता दिसते. आम्हाला तुझ्या कामाबद्दल खूप अभिमान आहे.
View this post on Instagram
तू ‘मंडला मर्डर्स’मध्ये साकारलेली रुक्मिणी ही भूमिका तुझ्या इतर भूमिकांपेक्षा खूप वेगळी आहे. तू दाखवून दिलंस की, फक्त काही सीनमधूनसुद्धा एक कलाकार त्याच्या कामानं प्रेक्षकांच्या मनावर कशी छाप सोडू शकतो.” असं पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नेटफिल्क्स या ओटीटीवर प्रदर्शित झालेली मंडला मर्डर्स ही वेबसिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या सिरीजची तुलना असुर नावाच्या वेबसिरीजसोबत केली जात आहे. दरम्यान, श्रेया पिळगावकर हिच्याबद्दल बोलायचं झाल्यास तिने अनेक वेबसिरीज आणि बॅालिवूड चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.





