आरोग्याच्या दृष्टीनेही कष्ट करावे – युवराज पाटील

चिंबळी – जीवन चांगले जगायचे असेल तर शिक्षणाबरोबर आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कष्ट केले पाहिजे, असे प्रतिपादन व्याख्याते युवराज पाटील यांनी केले. निघोजे (ता. खेड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नविन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या मुलांचे पालक व्हा मालक नव्हे विषयावर पाटील बोलत होते.
यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, अल्ट्रा टेक कंपनीचे समीर भोसले, यश भोसले, प्रमोद भोसले, विनायक शितोळे, दिनेश बागडे, दादासाहेब गोरे, राहुल बागले, वासुदेव शर्मा, अजय शिंदे, संग्राम पाटील, प्रतिक गोखले, अश्विनी हसबे, केंद्र प्रमुख हिरामण कुसाळकर, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, चेअरमन, व्हायचेअरमण, सर्व संचालक, कुरूळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक, पोलीस पाटील, शाळा समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, कर्मचारी वर्ग, आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घाटे यांनी, प्रास्ताविक मुख्याध्यापक कृष्णराज काटकर यांनी तर ज्ञानेश्वर नाणेकर यांनी आभार मानले.
विविध विकासकामांना आमदार व खासदार फंड मंजूर करून प्राधान्य दिले जाईल तसेच या परिसरात गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबविण्यासाठी पाहिजे ती मदत केली जाईल, असे आश्वासन खासदार डॉ. कोल्हे यांनी दिले.
लोकप्रतिनिधींना साकडे –
महानगाव निघोजे ग्रामपंचायत अर्थिक दृष्ट्या शक्षम असून महानगाव निघोजे येथील गायरान जमीन मिळाली तर विषेश निधीमधून शाळा, महाविद्यालय, प्रशासकीय इमारत विकासित करता येईल म्हणून जमिनीसाठी लोकनियुक्त सरपंच सुनिता येळवंडे यांनी खासदार डॉ. कोल्हे, आमदार काळे यांच्याकडे साकडे घातले आहे.





