निघोजेच्या सुभाषवाडीत भजन स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

चिंबळी – महानगाव (निघोजे) येथील सुभाषवाडी येथे श्री सद्गुरु शंकर महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य भजन स्पर्धेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कुरुळी-आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटात सन्मार्ग फाउंडेशन व शीतल आशिष येळवंडे यांच्या पुढाकाराने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत गटातील विविध भजनी मंडळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ताल, सूर आणि भक्तिरस यांच्या संगमाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. पारंपरिक सादरीकरण, स्त्री- पुरुष भजनी कलाकारांची कला आणि भाविकांचा उत्साह यामुळे हा वर्धापनदिन सोहळा अविस्मरणीय ठरला.
सर्व विजेत्या भजनी मंडळांचा यावेळी सन्मान करण्यात आला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी आयोजिका शीतल आशिष येळवंडे यांनी भावना व्यक्त करत सांगितले, कुरुळी-आळंदी ग्रामीण गटातील नागरिकांनी दाखवलेले प्रेम व पाठिंबा आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या स्पर्धेमुळे सामाजिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ झाले आहे.
भजन स्पर्धेतील विजेते –
प्रथम- गुरुदेव दत्त महिला भजनी मंडळ चिंबळी व केंद्रई माता महिला भजनी मंडळ, धानोरे, द्वितीय – मुक्ताबाई प्रासादिक भजनी मंडळ सोळू व श्री भैरवनाथ सांप्रदायिक भजनी मंडळ कुरुळी. तृतीय धनेश्वर भजन मंडळ धानोरे व हनुमान भजनी मंडळ चऱ्होली खुर्द, चतुर्थ – वैजेश्वरी माता महिला भजनी मंडळ चऱ्होली खुर्द व पद्मावती भजनी मंडळ, चिंबळी. पाचवा श्री भैरवनाथ भजनी मंडळ निघोजे व काळुबाई महिला भजनी मंडळ, निघोजे.
विशेष पारितोषिके –
उत्कृष्ट गायक प्रथम – हनुमान प्रासादिक भजनी मंडळ पिंपळगाव. द्वितीय विश्वगुरु मुलींचे भजनी मंडळ, केळगाव. उत्कृष्ट वादक प्रथम – विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ केळगाव. द्वितीय जोगेश्वरी महिला भजनी मंडळ निघोजे. उत्कृष्ट हार्मोनियम वादक प्रथम – विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ केळगाव. द्वितीय – रोकडोबा महाराज भजनी मंडळ, च-होली खुर्द.





