चिंबळी : खेड तालुक्यातील औधोगिक श्रेत्रातील चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, केळगाव, मरकळ परिसरात जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात तसेच ग्रामपंचायत मध्ये विविध मान्यवर व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांच्या उपस्थितीत 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडकेवस्ती ( निघोजे ) येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाल्याचे मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी सांगीतले. येथे ७९ वा स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रथमतः प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळा समितीचे अध्यक्ष राजेश येळवंडे, नवनाथ फडके, संतोष कामठे आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपुजन केल्या नंतर ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्य समाधान येळवंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर आप्पा फड़के यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मुलांची, ग्रामस्थांची भाषणानंतर पाढे पाठांतर स्पर्धेमधील विजेत्या विद्यार्थ्यांना समर्थ पतसंस्थेच्या वतीने स्ट्रॉफी, प्रमाणपत्र, व साहित्य भेट देण्यात आले. कार्यक्रमाला माजी उपसरपंच इंदिरा फड़के, ग्रामपंचायत सदस्या स्नेहा फडके, शिक्षण समिती सदस्य गजानन फडके, लताताई फड़के, प्रदिप शिरोळे सुरेश फड़के आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. प्रस्ताविक मुख्याध्यापक अरुण गायकवाड यांनी केले तर, मान्यवरांचे आभार शिक्षिका सिताबाई गेंगजे यांनी मानले.