“लाज वाटली पाहिजे, तुमच्या घरात आई-वडील, मुलं…”; पापाराझीला पाहताच सनी देओल संतापला

Sunny deol Angry on Paparazzi | बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांना बुधवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून पुढील काही दिवस ते घरीच उपचार घेतील, अशी माहिती कुटुंबीयांनी बुधवारी एका निवेदनात दिली. याआधी धर्मेंद्र यांच्या निधनाच्या बातम्या पसरल्याने याबाबत धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल व पत्नी हेमा मालिनी या दोघींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता.
यानंतर आता धर्मेंद्र व देओल कुटुंबीयांचा आणखी एक पर्सनल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धर्मेंद्र यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच अभिनेता सनी देओलने पापाराझींवर संताप व्यक्त केला आहे. सध्या पापाराझी मीडिया धर्मेंद्र यांच्या घराबाहेरच असून सनी देओल पापाराझींना पाहताच संतापला. घरातील पर्सनल व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे त्याने पापाराझींना “तुम्हाला लाज वाटत नाही का?” असा सवाल केला. Sunny deol Angry on Paparazzi |
View this post on Instagram
नेटकऱ्यांनीही साधला पापाराझीवर निशाणा
‘तुमच्या घरात आई-वडील, मुलं नाहीयेत का? लाज वाटली पाहिजे तुम्हाला…अजूनही तुम्ही XXXX सारखे व्हिडिओ शूट करत आहात’ अपशब्दांचा वापर करत त्यानं त्याचा राग व्यक्त केला. सनी देओलचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी देखील पापाराझीवर निशाणा साधला. ‘त्यांच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करा आणि संयम ठेवा,’ असे काही नेटकऱ्यांनी म्हंटले आहे. सध्या सनी देओलचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. Sunny deol Angry on Paparazzi |
हेही वाचा :
Juhi Chawla: ५८ वर्षांची झाली जूही चावला; जॅकी श्रॉफने दिल्या खास शुभेच्छा, शेअर केली गोड आठवण





