Gauri Sprat : बॅालीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खानच्या गर्लफ्रेंडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत गौरी स्प्रॅट पापाराझींवर चांगलीच भडकल्याचं दिसत आहे. खरंतर आमिराने त्याच्या वाढदिवसाला सर्वांना धक्का देत त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटस्प्रॅटची अॅानकॅमेरा ओळख करून दिली. त्यानंतर दोघेही अनेकदा एकत्र दिसले. हे दोघे एकत्र स्पॅाट झाल्यानंतर पापाराझींनी त्यांचे एकत्रित व्हिडीओ आणि फोटो काढलेले आहेत. पण नुकताच व्हायरल झालेल्या व्हिडीओत गौरी पापाराझींवर भडकली असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओत गौरी मॉर्निंग वॉकला गेल्याचं दिसत आहे. रस्त्यावर चालत असतानाच पापाराझी तिचा व्हिडीओ काढत आहे. View this post on Instagram A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap) ही बाब गौरीला खटकली आणि तिने यावर भडकत पापाराझींना व्हिडीओ काढू नका असं सांगितलं. ती म्हणते मला एकटं सोडा मी चालत आहे, त्यानंतर पापाराझी काहीतरी बोलून तिथून निघून जातात असं या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांकडून कमेंट्स करत पापाराझींवर संताप व्यक्त केला आहे. पापाराझींनी हा मूर्खपणा आता बंद करावा. काहींना हे सर्व आवडत नाही. त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर करा, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी पापाराझींना सुनावलं आहे. आमिरने आपल्या साठव्या वाढदिवसादिवशी मुबंईत एका पार्टीत अॅान कॅमेरा गौरी आणि त्याच्या नात्याबद्दल जाहीरपणे सांगितलं. त्यानंतर दोघांनीही एकत्रित अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. या दोघांच्या जोडीला आमिरच्या चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. हेही वाचा : पालकमंत्री हरवले आहेत!!! बुलढाण्यात शरद पवार गटाकडून तक्रार दाखल