Sunny Deol : सनी देओलच्या ‘सूर्या’ चित्रपटाचा पहिला लुक समोर; रिलीज डेटही जाहीर
Sunny Deol : ‘सूर्या’चे दिग्दर्शन एम. पद्मकुमार करत आहेत

Sunny Deol : अभिनेता सनी देओल लवकरच आगामी ‘सूर्या’ चित्रपटात दिसणार आहे. ‘बंटवारा १९४७’ सिनेमाच्या अपयशानंतर तो आता नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच चित्रपटाच्या मेकर्सनी याचे मोशन पोस्टर जारी करत रिलीज डेटचीही घोषणा केली आहे.
चित्रपटाच्या पहिल्या लूकमध्ये सनी देओलचा दमदार अंदाज पाहायला मिळत आहे. मोशन पोस्टर समोर आल्यापासूनच चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. सनी देओलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याच्या तोंडात सिगरेट आहे आणि तो इंटेन्स लूकमध्ये दिसत आहे.
यामध्ये सनीचा अँग्री मॅन अवतार बघून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. भूतकाळ आणि वर्तमानात अडकलेला तो, अखेर ‘सत्याचा’ उलगडा करतो!’ असं कॅप्शन त्याने दिलं आहे. मात्र, चित्रपटाची कथा आणि सनीच्या पात्राबद्दलची अधिक माहिती सध्या समोर आलेली नाही.
View this post on Instagram
‘सूर्या’चे दिग्दर्शन एम. पद्मकुमार करत आहेत. तर, कमल मुकुट हा चित्रपट प्रस्तुत करत आहेत. चित्रपटाची निर्मिती दीपक मुकुट, हेमंत मुकुट आणि लोकेश मुकुट यांनी एमएम मुव्हीजच्या बॅनर्सखाली केली आहे. सनी देओलचा हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यात सनी देओलचा वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. या सिनेमात रवी किशन देखील दिसणार आहेत.
हेही वाचा:





