‘तू तुझ्या घरचं बघं, तुझ्या मागं कुत्रं नाही…’; लक्ष्मण हाकेंना धमकीचा फोन; जरांगेंचा समर्थक असल्याचा केला आरोप

Laxman Hake | ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना धमकीचा फोन आला आहे. जरांगे यांच्या समर्थकांनी धमकी दिल्याचा दावा लक्ष्मण हाके यांनी केला आहे. पत्रकार परिषदेआधी लक्ष्मण हाकेंना फोन आला होता. यात धमकी देणाऱ्याने अरेरावी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत त्यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
लक्ष्मण हाके म्हणाले की, मला राज्यभरातून शेकडो जीवे मारण्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. मला शिवीगाळ केली गेली. मला जीवे मारण्याची धमकी दिली. मला आत्ताच एका अनोळखी नंबरवरून फोन आला होता. तू तुझ्या घरचे बघ, तुझ्यामागे कुत्र नाही असं असं धमकी देणाऱ्याने म्हटलंय. तसेच धमकी देणारा व्यक्ती सातारा जिल्ह्यातील असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. Laxman Hake |
आरोपींचं समर्थन केलेलं नाही
“बीड मधील घटनेवरून आरोपीची जात शोधून त्या एका जातीला लक्ष्य केलं जात आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. तुम्ही माझं कोणतंही भाषण काढा. मी कधीच आरोपींचं समर्थन केलेलं नाही. ज्या प्रवर्गवर अन्याय होतो त्या समजाचे बाजूने मी उभा राहतो. त्यात काय गैर आहे?” असा सवाल हाके यांनी केला आहे. Laxman Hake |
मुख्यमंत्र्यांनी दखल घेण्याची हाकेंची मागणी
“लातुरमध्ये आमदाराचा साथीदार धनगर युवकाला ऑनर किलिंगमधून ठार करतो पण कारवाई काहीच होत नाही. त्यावर समोरच्यांचे मला रोज धमक्यांचे फोन येतात. आजही प्रेसच्या आधी धमकीचा फोन आला. आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत असताना मला जातीवादी ठरवलं जातं आहे. लातुरात ऑनर किलिंग झालं त्याचा का निषेध केला जात नाही ? या गुन्ह्यातील आरोपीचे आमदार अभिमन्यु पवारसोबत फोटो आहेत. मग त्यावर का कोणी बोलत नाही. ओबीसी बांधवांसाठी आवाज उठवत असल्यामुळेच मला टार्गेट केलं जातं आहे. याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी,” अशी मागणी देखील लक्ष्मण हाके यांनी केली आहे. Laxman Hake |
हेही वाचा:
“आज माझे पप्पा गेले…आता काकाला गमावलं तर आम्ही काय करायचं?” ; वैभवी देशमुखचा प्रशासनाला संतप्त सवाल





