“वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते”; लालू प्रसाद यादवांच्या कुटूंबातील वाद पुन्हा समोर

Rohini Acharya | राष्ट्रीय जनता दलला (आरजेडी) बिहार निवडणुकीत मोठा पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर सातत्याने लालू प्रसाद यादव यांच्या कुटूंबातील वाद समोर येत आहेत. लालूप्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी थेट कुटुंबाशी सर्व संबंध तोडल्याचे सांगत बंधु तेजस्वी यादव यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
यानंतर आता लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आचार्य यांची एक नवी पोस्ट समोर आली आहे. ‘वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्या लोकांची गरज नसते’, असं रोहिणी आचार्य यांनी पोस्टमध्ये म्हंटल्याने त्यांचा पुन्हा एकदा रोख तेजस्वी यादव यांच्यावर असल्याचे म्हंटले जात आहे.
रोहिणी आचार्य यांची पोस्ट
रोहिणी आचार्य यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “मेहनतीने निर्माण केलेला आणि उभा केलेला मोठा वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते, त्यासाठी आपले आणि आपल्यांच्या भोवती असलेले काही ‘नवे षडयंत्रकारी’ पुरेसे असतात. आश्चर्य तर तेव्हा वाटतं, जेव्हा ज्यांच्यामुळे आपली ओळख निर्माण झाली, ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे.
बड़ी शिद्दत से बनायी और खड़ी की गयी “बड़ी विरासत” को तहस – नहस करने के लिए परायों की जरूरत नहीं होती, “अपने” और अपनों के चंद षड्यंत्रकारी “नए बने अपने” ही काफी होते हैं ..
हैरानी तो तब होती है , जब “जिसकी” वजह से पहचान होती है , जिसकी वजह से वजूद होता है , उस पहचान, उस वजूद के…
— Rohini Acharya (@RohiniAcharya2) January 10, 2026
त्याच ओळखीच्या खुणा पुसून टाकण्यासाठी स्वतःचीच माणसे कोणाच्या तरी सांगण्यावरून तयार होतात. जेव्हा विवेकावर पडदा पडतो आणि अहंकार डोक्यात जातो, तेव्हा विनाशकारी प्रवृत्ती तुमचे डोळे आणि कान बनून तुमची बुद्धी आणि शहाणपणा हिरावून घेत असते”, असं रोहिणी आचार्य यांनी म्हटलं आहे.
रोहिणी आचार्य यांच्या या पोस्टनंतर आरजेडीच्या अंतर्गत राजकारणाबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी कोणाचंही नाव घेतले नसलं तरी त्यांचे संकेत बरेच काही सांगून जातात. याआधी रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव, संजय यादव आणि रमीझ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. Rohini Acharya |
रोहिणी आचार्य कोण आहेत?
रोहिणी आचार्य व्यवसायाने डॉक्टर आहेत. काही वर्षांपूर्वी वडील लालू प्रसाद यादव यांना किडनी दान केल्यामुळे चर्चेत आल्या होत्या. रोहिणी आचार्य लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलाच्या माजी सदस्य आहेत. त्यांनी रोहिणी आचार्य यांचा गेल्या वर्षी सारण येथून लोकसभा निवडणूकीत भाजपाचे राजीव प्रताप रुडी यांच्याकडून पराभव झाला होता. Rohini Acharya |
हेही वाचा:
शाहिद कपूरचा खतरनाक अवतार! O ROMEO चित्रपटाचा टीझर आऊट; अॅनिमलफेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत





