‘तू मराठी व्यक्ती नाही,’ अंकिता लोखंडेवर नेटकरी भडकले

Ankita Lokhande Trolling | अभिनेत्री प्रिया मराठे हिने वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही काळापासून ती कॅन्सर या आजाराने ग्रस्त होती. तिच्या अकाली एक्झिटने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. तिच्या निधानाची बातमी धक्का देणारी आहे. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यात प्रियाने अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली होती.
प्रियाच्या अचानक जाण्याने अनेक कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. तर काहींनी प्रियाच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेऊन तिला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. परंतु अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर प्रियासाठी एकही पोस्ट लिहिली नव्हती. यावरूनच नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. अंकिताच्या फोटोंवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.
‘सॉरी पण तुझ्यापर्यंत प्रिया मराठेच्या निधनाची बातमी आली नसेल का? तिच्याविषयी एक तरी पोस्ट टाकायला हवं होतं. तू खरंच मैत्रीण होतीस का गं? मला तू खूप आवडायची, पण आज का कोणास ठाऊक मला तुझं वागणं खटकलं. तू तिला शेवटचं भेटायला जायला पाहिजे होतं. तिने तुझ्यासोबत काम केलं होतं. उषा नाडकर्णी यांनीही तिच्याविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. तू मराठी व्यक्ती नाही’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर आणखी एकाने, ‘प्रिया मराठेविषयी एकही पोस्ट किंवा स्टोरी का लिहिली नाही?,’ असा सवाल अंकिताला केला आहे. Ankita Lokhande Trolling |
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत अंकिताने अर्चना या मराठी मुलीची भूमिका साकारली होती. तर प्रिया या मालिकेत तिची छोटी बहीण वर्षाच्या भूमिकेत होती. याशिवाय अभिनेत्री प्रार्थना बेहेरेसुद्धा या मालिकेत काम करत होती.
दरम्यान, प्रार्थना प्रियाच्या अंत्यदर्शनाला पोहोचली होती. आपल्या खास मैत्रिणीला अखेरचा निरोप देताना तिला अश्रू अनावर झाले होते. प्रार्थनाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Ankita Lokhande Trolling |
हेही वाचा :





