‘तुम्हाला कुत्र्यांमध्ये…’, भर कार्यक्रमात चाहत्यांवर भडकली अभिनेत्री अक्षरा सिंह

Akshara Singh Angry | भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात अक्षराने भर कार्यक्रमात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमात काही लोक अक्षराला अश्लील हावभाव करत होते, त्यानंतर तिने स्टेजवरूनच गैरवर्तन करणाऱ्या लोकांना फटकारलं. अक्षराचा बिहारमधील आरा येथील बखोरापूर गावात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अक्षराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अक्षरा सिंह म्हणते की, तुम्ही यशस्वी होता हे काही लोकांना दिसत नाही, जर तुमच्यात इतकी ताकद असेल तर पुढे या, माझ्यात हिंमत आहे. अक्षरा सिंगला हलक्यात घेऊ नकोस. मी सिंग आहे हे विसरू नको. पुढे या मागून कुत्रे भुंकतात आणि निघून जातात. तूमची गिनती मी कुत्र्यांमध्येच करणार.” असे तिने म्हंटले आहे.
View this post on Instagram
हा व्हिडिओ ३० मार्चचा असून बिहारमधील बखोरापूर गावात एका कार्यक्रमात अक्षरा परफॉर्म करत होती. तेथे अनेक सामाजिक कार्यकर्ते, भाजप नेते आणि भोजपुरी कलाकारही उपस्थित होते. मात्र अक्षरा जेव्हा स्टेजवर आली आणि गाणं म्हणू लागली, तेव्हा तिथे जमलेल्या चाहत्यांनी मोठ्या संख्येनं आरडाओरडा करायला सुरुवात केली. तो मागून अश्लील हावभाव करू लागला. यावर अक्षरा सिंगला राग आला आणि तिने स्टेजवरूनच लोकांना सुनावले. Akshara Singh Angry |
हेही वाचा:





