‘तू तर दलित आहे’; जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडला केलं ट्रोल; शिखरनेही दिलं सडेतोड उत्तर

Shikhar Pahariya | अभिनेत्री जान्हवी कपूर बिझनेसमन आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला डेट करत आहे. जान्हवी अनेकदा शिखरसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. गेल्या वर्षीच्या दिवाळी सेलिब्रेशनचा एक फोटो शिखरने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यावर एका नेटकऱ्याने शिखरला ‘दलित’ असं संबोधलं. ज्यानंतर शिखरने देखील इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संबंधित नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.
शिखर पहाडियाने पोस्टवर एका युझरने कमेंट करत लिहिले, ‘पण तू तर दलित आहेस.’ याच कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर करत शिखरने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. “२०२५ मध्येही इतक्या मागासलेल्या आणि नीच विचारसरणीचे लोकं आहेत. दिवाळी हा सण प्रकाश, विकास आणि एकात्मतेचा आहे. पण हे सगळं तुमच्या बुद्धीच्या पलीकडे आहे,” असे शिखरने म्हंटले आहे.
View this post on Instagram
;
“विविधतेत एकता आणि सर्वसमावेशक वृत्ती ही भारताची कायमच ताकद राहिली आहे. पण हे समजण्याएवढी बुद्धी तुमच्याकडे नाही. वाईट विचार पसरवण्याऐवजी तुम्ही स्वत:लाच शिक्षित केलं पाहिजे. कारण सध्या तुमचे विचार ही एकच गोष्ट अस्पृश्य आहे,” अशी शिखरने पोस्ट शेअर करत युझरला सडेतोड उत्तर दिले आहे.
शिखर पहाडिया हा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंना तीन मुली आहेत. त्यापैकी स्मृती शिंदे यांचा शिखर मुलगा आहे. तर शिखरचा मोठा भाऊ वीर पहाडियाने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अक्षय कुमारच्या ‘स्कायफोर्स’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. Shikhar Pahariya |
जान्हवी आणि शिखर कॉलेजपासून सोबत आहेत. तेव्हाच त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. मधल्या काळात त्यांच्यात दुरावा आला होता, परंतु आता दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. या दोघांनी माध्यमांसमोर कधी प्रेमाची जाहीर कबुली दिली नसली तरी अनेकदा दोघेही एकत्र पाहायला मिळतात. Shikhar Pahariya |
हेही वाचा:





