योगी आदित्यनाथ यांचा महाराजांचा जिरेटोप घातल्याचा फोटो व्हायरल; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतापले थेट म्हणाले….

Yogi Adityanath | Harshvardhan Sapkal | शिवराज्यभिषेक दिनाच्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जिरेटोपी घातल्याचे दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया येत होत्या.
अशातच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जिरेटोप घालण्याची हिंमतच कशी झाली असा सवाल त्यांनी केला आहे. योगी आदित्यनाथ यांनी महाराजांचा जिरेटोप घालून अपमान केला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील सपकाळ यांनी केली आहे.
जिरेटोपाला अन्यन्यसाधारण महत्व आहे पण भाजपचे नेते सातत्याने जिरेटोप घालून महाराजांचा अपमान करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते पण जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात असून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचे सपकाळ म्हणाले.
शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हटले जाते. पण महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या दुष्ट प्रवृत्तींचा आज महाराष्ट्रात नंगानाच सुरु असल्याचे ते म्हणाले. या प्रवृत्तीचा आतापर्यंत समूळ नायनाट केला नाही असा त्यांनी केला असून आता मात्र या प्रवृत्तींचा कडलोट करा, असे देखील मागणी सपकाळ यांनी केली आहे.
फडणवीसांवर साधला निशाणा
सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला. गेल्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ब्राम्हण समाजात साखरेचे काम करतो, असे विधान केले होते. या विधानवरून सपकाळ यांनी फडणवीसांचे विधान एकाकी असल्याची टीका केली आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीन प्रगतीत सर्व जाती धर्मांच्या लोकांनी योगदान दिलेले आहे. ही कोणत्या एका जातीची ठेकेदारी नाही तर अठरापगड जातींचे योगदान आहे, असे सपकाळ यांनी ठणकावून सांगितले.
हेही वाचाः राज्य पोलीस दलातील ११ एसीपींच्या बदल्या, गृहविभागाने जारी केले आदेश





