स्वारगेट अत्याचार प्रकरणी योगेश कदम म्हणाले, “गुन्हा घडला तेव्हा….”

Yogesh Kadam on Swargate case । पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना बुधवारी समोर आली. या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच सर्वपक्षीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनीही आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात करण्यात आली आहेत. या संदर्भात गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी आज स्वारगेट बसस्थानकात घटना स्थळी भेट दिली. त्यासोबतच पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली . यावेळी त्यांनी या प्रकरणी महत्त्वाची माहिती दिली आहे.
अर्ध्या तासात आरोपीची ओळख पटवली Yogesh Kadam on Swargate case ।
घडलेल्या घटनेविषयी माहिती देताना मंत्री योगेश कदम यांनी,” पोलिसांनी अर्ध्या तासाच्या आत आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर त्याला ट्रॅक करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आठ पथकं केली आहेत. त्याचं संभाव्य लोकेशनही मिळालं आहे. मात्र तपास सुरु असल्याने मी ते देणार नाही. आरोपीला लवकरच अटक केली जाईल. एक गैरसमज तयार केला जातो आहे की घटना मंगळवारी घडली आणि बुधवारपर्यंत माहिती समोर आणली गेली नाही. मात्र ही फिर्याद आल्यानंतर तातडीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली होती.” असे त्यांनी म्हटले.
सदर प्रकरणाबाबत पोलिसांनी गुप्तता बाळगली Yogesh Kadam on Swargate case ।
पुढे बोलताना त्यांनी,” पोलिसांनी गुप्तता बाळगली होती कारण आरोपीला या गोष्टीचा तपास लागता कामा नये. आरोपी पळून जाऊ नये म्हणून गुप्तता पाळण्यात आली. ती पाळणं आवश्यक आहे. आरोपी लवकरच पकडला जाईल. पुणे शहरात जी घटना घडली आहे ती बस स्टँडच्या आवारात घडली आहे. पोलिसांनी रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत गस्त कितीवेळा घातली गेली याचीही माहिती मी घेतली आहे. पीआयही रात्री दीड वाजता गेले होते, त्यानंतर टीमसह तीन वाजताही तिथे होते. पोलीस अलर्ट नव्हते असा विषय नव्हता. आरोपीवर भुरट्या चोरीचे गुन्हे दाखल आहे. मात्र ते ग्रामीण भागातल्या पोलीस ठाण्यात आहे. पुणे शहरात जे आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलीस लक्ष ठेवून असतात. त्यांचं रेकॉर्ड पोलिसांकडे असतं. जे ग्रामीण भागातून येतात त्यांचा रेकॉर्ड नसतो. पुणे शहरात सीसीटीव्ही आणखी मोठ्या प्रमाणावर वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आपण त्या दृष्टीनेही काम करतो आहे.” असेही त्यांनी म्हटले आहे.
१० ते १५ लोक आवारात होते कुणालाही काही आवाज आला नाही
पुण्यात जी घटना घडली ती फोर्सफुली घडली किंवा स्ट्रगल झाला असं काही कळलं नाही. कारण १० ते १५ लोक त्या आवारात होते. त्यामुळे गु्न्हा आरोपीला करता आला. असेही योगेश कदम यांनी म्हटलं आहे. पोलिसांकडून कुठलीही दिरंगाई झालेली नाही. घटना घडली तेव्हा कुठलाही अलर्ट मिळाला नाही. जी खासगी सुरक्षा ठेवली जाते त्यांनी नक्कीच चुका केल्या आहेत. कारण खासगी सुरक्षा रक्षक गुन्हा घडला तेव्हा तिथे नव्हते अशी माहिती देखील योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.





