Yoga Day : खानापूर विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

Yoga Day : भोर तालुक्यातील खानापूर गाव येथील राजगड ज्ञानपीठ संस्थेच्या संचालित सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त भारतीय जनता पक्ष आयोजित योग दिन कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सोबत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजप भोर तालुका दक्षिणचे अध्यक्ष रवींद्र कंक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी योगशिक्षक डॉ. आनंदा कंक यांनी योग दिनानिमित्त योगा विषयी उपयुक्त माहिती सांगितली. या माहितीपर व्याख्यानानंतर प्रत्यक्ष योगातील प्रात्यक्षिक स्वतः सादर केली. योग दिनानिमित्त सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या कडून योगशिक्षक डॉ. कंक यांनी करून घेतली. यानंतर माजी मुख्याध्यापक बुदगुडे सर यांनी योग दिनाचे आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली.
आजच्या स्पर्धेच्या काळातील योगाचे महत्व त्यांनी विद्यार्थ्यांना सर्व उपस्थित मान्यवर व राजगड ज्ञानपीठच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना समजून सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांना रोज योगा करण्याची शपथ देखील देण्यात आली. याप्रसंगी उद्योजक व महाविद्यालयाचे माजी प्राचार्य रमेश बुदगुडे , भाजप भोर तालुका माजी उपाध्यक्ष समीर घोडेकर , ज्येष्ठ नागरिक सोपान मोरे व युवा नेते सुशांत रवळेकर पाटील, सर्व विद्यार्थी, शिक्षक, इतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थिती होते.





